शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
4
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
5
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
6
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
7
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
8
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
9
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
10
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
11
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
12
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
13
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
15
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
16
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
17
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
18
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
19
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
20
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात युवकांच्या आत्महत्त्यांमध्ये वाढ

By admin | Updated: September 19, 2016 19:40 IST

जगात दर 40 मिनिटांनंतर एक व्यक्ती स्वत:हून मृत्यू जवळ करते. जगात आत्महत्याद्वारे मरणा:यांमध्ये 15 ते 35 वर्षे वयोगटातील युवकांचे प्रमाण जास्त आहे.

सोनाली देसाईपणजी, दि. १९  : जगात दर 40 मिनिटांनंतर एक व्यक्ती स्वत:हून मृत्यू जवळ करते. जगात आत्महत्याद्वारे मरणा:यांमध्ये 15 ते 35 वर्षे वयोगटातील युवकांचे प्रमाण जास्त आहे. गोव्यात फेब्रूवारी ते मे 2016 या काळात 16 ते 18 वयोगटातील 22 मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. एका व्यक्तीच्या आत्महत्येची घटना ही इतरांवर प्रभाव टाकते आणि नैराश्यात असलेल्या किमान सहा व्यक्ती मग आत्महत्येचा विचार पक्का करु लागतात असे आढळून येते.

जागतिक आत्महत्या प्रतिबंधनात्मक आठवडा सुरु झाला आहे. त्यानिमित्त राज्यात आत्महत्या प्रतिबंधनासाठी कोणती पावले उचलता येतील याबाबत काही तज्ज्ञांशी चर्चा केली. देशातील लहान अशा गोवा राज्यात आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्वाधिक आत्महत्या होणा:या राज्यांमध्ये गोवा हे पाचव्या क्रमांकावर आहे. आत्महत्या हा एक विचार आहे. नैराश्य, राग, असहाय्यतासारखे विचार मनात दाटून येउ लागल्यावर आपल्याला या जगात रहायचे नाही, आपण मुक्तपणो किंवा हौसेने जगू शकत नाही असा विचार व्यक्तीच्या मनात येतो.

एकटेपणाचे शिकार असलेल्या व्यक्तीही आत्महत्या करण्याबाबत विचार करु लागतात. कोणताही व्यक्ती थेट जाउन आत्महत्या करत नाही. काही माणसांच्या मनात जीवन संपवण्याबाबत खूप दिवस विचार घोळत असतात. आपली कोणाला गरज नाही, आपल्याला कोणती किंमत देत नाहीत असे विचार त्याच्या डोक्यात फिरु लागतात. जगाला आपल्याशी घेणोदेणो नाही तर आपण जिवंत राहून काय उपयोग आहे. आपल्या ध्येयांबाबत, स्वप्नांबाबत अयशस्वी झाल्यासही व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. आत्महत्या करण्याचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आहे. मात्र आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणा:यात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे.

कुज मेंटल हेल्थ फाउंडेशनच्या डोना नोरोन्हा म्हणतात, भावना व्यक्त करण्यासाठी जवळपास कुणीही नसले की व्यक्तींना नैराश्य येते. भरभरुन बोलणारी, भावना, दुख, वेदना व्यक्त करण्यासाठी फोन करणारी अनेक माणसं कुजमध्ये फोन करतात. कुजमधील समुपदेशकांशी बोलल्यानंतर त्यांच्या मानसिकतेत बदल होतो. आत्महत्येचे विचार डोक्यात घोळत असताना आम्ही तुम्हाला फोन केला आणि विचार बदलला असे सांगणारेही फोन येतात.

आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेला प्रत्येक मणूस हा 90 टक्के मानसिक आजाराचा शिकार असतो. मनमोकळे करण्याचे साधन असल्यास ब:याच आत्महत्या रोखता येणो शक्य आहे. ज्यापद्धतीने डेंग्यू, मलेरियाचा फैलाव होवू नये म्हणून जागृती केली जाते. तसेच आत्महत्या प्रबंधक जागृती होणो आवश्यक आहे. आत्महत्येची विविध कारणो असली तरी आपल्या समस्यांवर कोणताही उपाय नाही आणि ब:याच वेळा या समस्या कुणाकडे बोलता येत नाही आणि ही घुसमट सहन न झाल्याने आत्महत्येचा पर्याय स्विकारणारे लोक असतात.

गोव्यात गळफासाचा पर्यायराज्यात होणा:या सर्वाधिक आत्महत्या या वयोगट 15 ते 35 मध्ये होतात. यात मुलांची संख्या मुलींपेक्षा जास्त आहे. देशात विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न सर्वात अधिक होतो. मात्र राज्यात गेल्या तीन वर्षाच्या अभ्यासाप्रमाणो गळफास लावून आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यानंतर पाण्यात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला जातो. तर 30 टक्के व्यक्ती विषारी द्रव्य पिउन आत्महत्येचा प्रयत्न करतात. युवा पिढीत करिअरमधील असफलता, प्रेम प्रकरणो, बेकारी, व्यसनाधीनता आणि व्यसनांमधून बसलेला आर्थिक फटका आदी आत्महत्येची कारणो आढळतात. बोला, ताण कमी कराव्यक्तींच्या मनात घुसमट वाढू लागली की तो ताणतणावाचा शिकार बनतो. यातून मार्ग काढता आला नाही तर तो नैराश्यात जातो. मोकळेपणाने संवाद साधल्यास तणाव दूर होण्यास मदत होते. मनावरील आणि डोक्यावरील मानसिक तणावाचे ओङो उतरल्यास व्यक्तीला संकटातून मुक्त होण्याचे पर्याय शोधण्याची शक्ती मिळते. मात्र अबोल्यामुळे तो मनातच कुढत राहतो आणि त्याची मानसिकता कमकुवत बनू लागले. अशी व्यक्ती समाजाशी, कुटुंबातील सदस्यांशी, मित्रमंडळींशी संवाद तोडते आणि टप्याटप्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते. मनमोकळेपणाने बोलणारी व्यक्ती कोणत्याही संकटाचा सामना करण्याची ताकद ठेवू शकते. त्यामुळे मनातील सल, तणावाची कारणो आपल्या जवळच्या आणि विश्वासाच्या माणसांकडे बोला. बोला म्हणजे नैराश्य टाळता येईल, आत्महत्येचा विचार येणार नाही, अशी मत समाजकार्यकत्र्या आणि महिलांसाठी समुपदेशनाचे वर्ग घेणा:या डॉ. शुभा शिरवईकर मांडतात.