शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

फळपीक विमा योजनेची मुदत वाढवा

By admin | Updated: November 11, 2016 05:39 IST

५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका सामान्य शेतकऱ्यांनाही बसत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी

मुंबई : ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका सामान्य शेतकऱ्यांनाही बसत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी असल्याने, फळपीक विमा भरण्याची मुदत येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची मागणी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे यांनी गुरुवारी केली. फळपीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत १० नोव्हेंबर रोजी संपली आहे. मात्र, केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केल्याने शेवटच्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांना विमा हफ्ता भरण्यात मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना विम्याचा हफ्ता भरता आला नाही. विम्याचे पैसे मुदतीत भरता न आल्यास शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळू शकणार नाही. द्राक्ष, केळी, डाळिंब, आंबा या फळबागांना विम्याचे संरक्षण न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पुढील काही दिवस वैध नोटांचा तुटवडा कायम राहणार असल्याने फळपीक विमा भरण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. मागील पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना १० हजारांपर्यंतची रक्कम मिळणार असल्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र, शेतकऱ्यांच्या हातावर दीड-दोन हजारांची रक्कम टेकविण्यात आली. शेतकऱ्यांकडून विम्याचा हफ्ता घेऊनही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या नावाखाली सुरू झालेली योजना प्रत्यक्षात विमा कंपन्यांच्या हिताची ठरत आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी सरकारने योग्य पावले उचलावित, अशी मागणीही वाघमारे यांनी केली. (प्रतिनिधी)