शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
3
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
4
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
5
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
6
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
7
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
8
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
9
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
10
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
11
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
13
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
14
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
15
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
16
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
17
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
18
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
19
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
20
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित

तलावांतील साठ्यात वाढ

By admin | Updated: July 21, 2014 03:28 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने सातही तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ नोंदविण्यात येत

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने सातही तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ नोंदविण्यात येत असून, सद्य:स्थितीमध्ये आता या सात तलावांत २ लाख १४ हजार ३० दशलक्ष लीटर उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे भविष्याचा विचार करीत महापालिकेने २० टक्के पाणीकपात लागू केली होती. जुलैच्या पूर्वाधात पावसाने तलाव क्षेत्रात खाते उघडले. मात्र खबरदारी म्हणून प्रशासनाने पाणेकपात कायम ठेवली. दरम्यान, तलाव क्षेत्रात संततधार सुरू असल्याने पुढील सुमारे २३ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा वाढला आहे. आणि पाणीसाठ्याची तूट भरून निघण्यासाठी पुढील तीन महिने दमदार पावसाची आवश्यकता आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.सद्य:स्थितीमध्ये मोडक सागरमध्ये ७३ हजार ५५८ दशलक्ष लीटर उपयुक्त पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. तानसामध्ये २३ हजार ३८५ दशलक्ष लीटर, विहारमध्ये ८ हजार ४५८ दशलक्ष लीटर, तुलसीमध्ये ६ हजार ४५८ दशलक्ष लीटर, भातसामध्ये ८२ हजार ८३७ दशलक्ष लीटर आणि मध्य वैतरणामध्ये १९ हजार ३३४ दशलक्ष लीटर पाण्यासाठ्याची नोंद झाल्याची माहिती पालिकेने दिली. (प्रतिनिधी)