ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. ४ : सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे भागभांडवल वाढविण्याबाबत केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेच्या मिशन संचालकांनी कळविले आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूरसाठी २८३ कोटीचा निधी आला आहे. कंपनीने हा निधी बँकेत ठेवला आहे. अद्याप कंपनीसाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे पुढील काम थांबले आहे. महापालिकेचा हिस्सा ५0 कोटीची रक्कम अद्याप कंपनीकडे जमा करण्यात आलेली नाही. याबाबात योग्य ती कार्यवाही व्हावी असेही कळविण्यात आले आहे.
कपंनीचे भागभांडवल ५ लाखाऐवजी आणखी वाढवा असे सुचित करण्यात आले आहे. मिशन संचालकांनी वेगवेगळ्या सूचना असलेले ३ पानी पत्र स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनीच्या नावे पाठविले आहे. प्रभारी सीईओ श्रीकांत मायकलवार यांनी हे पत्र स्वीकारून त्याबाबत संचालक तथा आयुक्त विजयकुमार काळम यांच्याशी गुरूवारी चर्चा केली. याबाबत कंपनीचे अध्यक्ष मिलींद म्हैसकर यांना माहिती देण्यात आली आहे.