शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात ११ मार्चपासून नवे निर्बंध लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 21:58 IST

Coronavirs Restrictions : पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत

ठळक मुद्देपुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेतकल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून आता पुन्हा एकदा प्रशासनानं कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय धेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकानं आता सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंतच खुली ठेवण्यास मुभा असेल. दरम्यान, हे निर्बंध पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहेत. कल्याण डोंबिवली परिसरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ३९२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच सध्या २३६ कोरोनाबाधितांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीव कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पालिका क्षेत्रात पुन्हा नवे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीतील काही महत्वाचे निर्णय

  • दुकानं सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत सुरू राहतील. यातून अत्यावश्यक सेवा, भाजीपाला, फळे, किराणा, दुध आणि वृत्तपत्र सेवांना वगळण्यात आलं आहे.  
  • प्रत्येक शनिवार आणि रविवार या दिवशी दुकानं P1 आणि P2  नुसार सुरू राहतील. 
  • हातगाड्या, फेरीवाली यांना सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेतच परवानगी असेल. 
  • शहरातील सर्व आठवडे बाजार बंद राहतील. 
  • भाजी मंडया ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील. 
  • सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, उत्सव समारंभ यांना परवानगी देण्यात येणार नाही.  
  • लग्न व इतर समारंभांमध्ये नियमांचं पालन करावं लागणार आहे. तसंच पोलीस स्थानकात प्रतिज्ञापत्रही सादर करावं लागणार आहे.  
  • बार आणि रेस्टॉरंट सायंकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार, होम डिलिव्हरीसाठी १० वाजेपर्यंत परवानगी असेल.
टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीcorona virusकोरोना वायरस बातम्या