शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात दुधसंकलनात वाढ

By admin | Updated: May 10, 2014 21:51 IST

शासकीय दुधसंकलन केंद्रात वाढ झाली आहे.

वाशिम : मागील वर्षीच्या जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात स्थानिक शासकीय दुधसंकलन केंद्रात जिल्हयातील दुध उत्पादक सहकारी संस्थांकडून पुरवठा करण्यात आलेल्या दुधाच्या तुलनेत यावर्षी याच चार महिन्याच्या कालावधीत दुध उत्पादक सहकारी संघाकडून करण्यात येत असलेल्या दुधपुरवठयात वाढ झाली आहे.

विशेषत एप्रिल महिन्यात सामान्यात : दुध संकलनात दरवर्षी घट असल्याचा सार्वत्रिक अनुभव असताना वाशिमच्या शासकीय दुधसंकलन केंद्रात गतवर्षीच्या तुलनेत प्रतिदिनी सरार्स एक हजार लीटरएवढी वाढ झाली आहे. जिल्हयात वाशिम व कारंजा येथे १0 हजार लीटर सावठवण क्षमतेची प्रत्येकी एक या प्रमाणे शासकीय दुधशितीकरण केंद्रे आहेत. या केंद्रामध्ये सन २00३ पर्यंत प्रतिदिनी प्रत्येकी पाच हजार लीटर एवढे दुधसंकलन होत होते.पंरतु, नंतरच्या काळात वारंवार दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे दुग्धोत्पादनात घट झाली तसेच विविध कारणामुळे अनेक दुध उत्पादक सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती ढासळली.त्यामुळे त्याचाही शासकीय दुधसंकलन केंद्राला केल्या जाणार्‍या दुधपुरवठयावर परिणाम झाला. वाशिम व कारंजा येथील शासकीय दुधशितीकरण केंद्राला होणार्‍या दुधपुरवठयात झपाटयाने घट होत गेली वाशिमचे शासकीय दुधशितीकरण केंद्र कसेबसे सुरु राहीले परंतु, कारंजा येथील शासकीय दुधशितीकरण केंद्र कालांतराने बंद पडले ते आजही बंद आहे. वाशिमच्या शासकीय दुधसंकलन केंद्रातील दुधशितीकरण केंद्रातील दुधसंकलन २00५ -0६ मध्ये अवघ्या एक हजार लीटर एवढे कमी झाले होते.त्यानंतर पंतप्रधान पॅकेजमधून जिल्हाप्रशासनाकडून व पशुसंवर्धन विभागाकडून विशेष घटक योजनेतून जिल्हयात गायी, म्हशीचे मोठया प्रमाणात वाटप करण्यात आल. महानंदच्या योजनेतूनही गायी म्हशीचे वाटप करण्यात आले तसेच २00९ पासून अजूनही जि.प. पशुसंवर्धन विभाग व उपायुक्त पशुसंवर्धन यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून विविध योजनांमधून शेतकर्‍यांना अनुदानावर गायी व म्हशीचे वाटप करण्यात येत आहे. परिणामी जिल्हयात दुग्धोत्पादनात वाढ झाली आहे. मागीलवर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याच्या काळात वाशिमच्या शासकीय दुधशितीकरण केंद्रात दुधउत्पादक सहकारी संस्थाकडून सरासरी २७00 लीटर प्रतिलिटरने दुधाचे संकलन झाले होते. चालुवर्षी याच चार महिन्याच्या काळात प्रतिदिन सरासरी ३२५0 लीटर एवढे संकलन झाल्याची नोंद आहे. सध्या शासकीय दुधखरेदीत घेतल्या जाणार्‍या गायीच्या ४.0 फॅट असलेल्या दुधाला २१ रुपये ५0 पैेस लीटर तर म्हशीच्या ६.५ फॅट असणार्‍या दुधाला ३0 रुपये ५0 पैसे प्रती लिटरचा भाव मिळत आहे. गायीच्या ४.0 फॅटपेक्षा जास्त प्रत्येक पाईटला व म्हशीच्या ६.५ फॅटपेक्षा जास्त प्रत्येक पाईटला ३0 पैसे प्रमाणे जास्त दर दिला जात आहे.