शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

राज्यात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2016 03:58 IST

पावसाळा सुरू झाल्यावर पसरणाऱ्या साथींच्या आजारांत यंदा राज्यातील शहरे अग्रक्रमावर दिसून येत आहेत. पुणे, नाशिक, ठाणे या शहरांत गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर पसरणाऱ्या साथींच्या आजारांत यंदा राज्यातील शहरे अग्रक्रमावर दिसून येत आहेत. पुणे, नाशिक, ठाणे या शहरांत गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. पण त्याचबरोबर मलेरियाच्या प्रमाणात ५० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. गेल्यावर्षी डेंग्यूचे १ हजार ६०० रुग्ण आढळून आले होते. तर, यंदा जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत (१४ सप्टेंबर) या कालावधित डेंग्यूचे २ हजार ५७२ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूमुळे राज्यात गेल्यावर्षी १० जणांचा तर यंदा दोघांचा मृत्यू झाला आहे. पुणे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर या परिसरात डेंग्यूचे अधिक रुग्ण असून नवी मुंबई व मुंबईत या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याचे आरोग्य विभाग सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी सांगितले.गेल्या काही वर्षांत राज्यात मलेरियाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत होती. पण, यंदा या रुग्णांमध्ये ५० टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षभरात मलेरियाचे ३० हजार रुग्ण आढळून आले होते. तर, यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत १५ हजार रुग्ण आढळले आहेत. चिकनगुनियाचे ४५० रुग्ण असल्याची आकडेवारी आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. (प्रतिनिधी)मुंबई : उसंत घेतलेला पाऊस मुंबईत पुन्हा सुरू झाला असून सप्टेंबरमध्ये डेंग्युमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतला हा डेंग्यूचा दुसरा मृत्यू आहे. सप्टेंबरमध्ये साथीच्या रुग्णांत थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे. या महिन्यात तापाचे ४ हजार ६०७ रुग्ण आढळले असून डेंग्यूचे १२२ रुग्ण आढळले आहेत. विक्रोळीच्या चैतन्य नगरमध्ये राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचा ८ सप्टेंबरला डेंग्यूमुळे मृत्यू झाला. ही महिला मूळची मालवणची आहे. ती रुग्णालयात दाखल होण्याआधी १० दिवस मुंबईत मुलाकडे राहायला आली होती. ३० आॅगस्टला ताप, डोकेदुखीचा त्रास तिला जाणवू लागला. त्यामुळे तिला पवईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले. त्यानंतर तिला डोंबिवलीच्या रुग्णालयात हलवण्यात आले. औषधोपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे ३ सप्टेंबरला तिला नायर रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जानेवारीत डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू झाला होता. ११ सप्टेंबरपर्यंत मलेरियाचे ३१५, लेप्टोचे ९, गॅस्ट्रोचे २४९, हॅपिटायटिसचे ६३ आणि कॉलराचा १ रुग्ण आढळला असल्याची आकडेवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. ठाणे-डोंबिवलीत डेंग्यूचे तीन बळीठाणे : सतत बदलत्या हवामानामुळे ठाणे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दिवसेंदिवस ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत डेंग्यूने शहरात तिघांचा मृत्यू झाला असून लेप्टोनेदेखील एक महिला दगावल्याची माहिती समोर आली आहे. शहरात आतापर्यंत सुमारे २४५ च्या आसपास लोकांना डेंग्यूची लागण झाली असून महापालिकेच्या कळवा रुग्णालयाबरोबरच आरोग्य केंद्रेदेखील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमुळे फुल्ल झाली आहेत.मलेरिया, ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. शहरात आतापर्यंत सुमारे २४५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली असून त्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, ८२४ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळल्याचेही सांगितले. तर, मुंब्य्रात डेंग्यूचा विळखा वाढला असून घोडबंदरसारख्या सोसायट्यांच्या भागातही डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती पालिकेच्या सर्व्हेतून पुढे आली आहे. तर, लेप्टोनेदेखील एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कळवा रुग्णालयातदेखील ओपीडीवर येणाऱ्या रुग्णांचा आकडा ५०० वरून एक हजाराच्या आसपास गेला आहे. पालिकेच्या २५ आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेण्यासाठी रुग्णांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.