शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

धरणातील साठा वाढता वाढेना...

By admin | Updated: July 14, 2017 01:32 IST

जून महिन्याच्या सुरुवातीला भोर तालुक्यासह भाटघर, नीरा-देवघर धरणांच्या पट्ट्यात पावसाने चांगली सुरुवात केली होती़

लोकमत न्यूज नेटवर्कनेरे : जून महिन्याच्या सुरुवातीला भोर तालुक्यासह भाटघर, नीरा-देवघर धरणांच्या पट्ट्यात पावसाने चांगली सुरुवात केली होती़ यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत चालली होती़ मात्र मागील आठवड्यापासून पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने पाणीसाठ्यातील वाढ ठप्प झाली आहे. आजच्या स्थितीला भाटघर धरणात सहा टीएमसी, तर नीरा देवघर धरणात साडेतीन टीएमसी पाणीसाठा आहे़.तालुक्यातील भाटघर, नीरा-देवघर धरण परिसरात अत्यल्प पाऊस पडत असल्याने धरणसाखळीत आजअखेर समाधानकारक पाणीसाठा नाही़ यामुळे या धरणांच्या पाण्यावर अवलंबून आसणारे पूर्वेकडील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तालुक्याच्या डोंगर माथ्यावर पडणाऱ्या पावसापेक्षा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस पडत होता़ मात्र आठ दिवसांपासून पावसाची विश्रांती वाढत चालल्याने परिसरातील भातरोपे करपत चालली आहेत, तर धरणांच्या पूर्वेकडील भागात शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत़ तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़>लोकमत न्यूज नेटवर्कवेल्हे : वेल्हे तालुक्यातील साठवण क्षमतेने सर्वात मोठे असणाऱ्या पानशेत धरणाच्या खोर्यात मागील दि.२५ जून ते ५ जूलै दरम्यान झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात कांही आंशी भर पडली आहे. मात्र ५ जुलैपासून पावसाचा जोर कमी झाल्याने पानशेत धरणात येणार्या पाण्याचा वेग आतिशय मंदावला आहे. परिणामी धरणसाठ्यात जलद गतीने होणारी वाढ कमी झाली आहे. दि. १३ जुलैअखेर धरणात ४६.८७% पाणी आहे. वेल्ह्यानजीक असाणार्या कानंदी नदीवरील गुंजवणी धरणातही पाणीसाठ्यात काहीशी वाढ होऊन सध्या पाणी २८.३६% पाणी असून वाढ स्थिर झाली आहे. तसेच मोसे नदी खोयार्तील वरसगाव धरणसाठ्यातही पाण्याची भर होण्याचा वेग मंदावला आहे. सध्या वरसगाव धरणात २१.०४ एवढे पाणी आहे. तर टेमघर धरणातही पाणी पातळीत मागील आठवड्यापासून विशेष वाढ झाली नसून येथे ७.९६ %पाणी आहे. तर खडकवासला धरणात २५.५१% पाणीसाठा शिल्लक आहे.पुणे शहराला पाणिपुरवठा करणा?्या खडकवासला धरण साखळीत खडकवासला धरणाच्या आगोदर पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणसाखळी असून वेल्हे तालुक्यात पडणार्या पावसावर पानशेत आणि वरसगाव ही दोन धरणे भरतात. तर टेमघर धरण मुळशी तालुक्यात येते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या साखळीत पाण्याची वाढ होण्याची गती मंदावली आहे.आंबी नदी खोरे, मोसे नदी खोरे, पानशेतचा कोकणालगत रायगड जिल्ह्यानजीकचा अतिदुर्गम पश्चिम पट्टा या भागात मागील सप्ताहापासून पावसाने उघडझाप करण्याचे धोरण अवलंबले असल्याने धरणाकडे पाणी येण्याचा वेग कमी झाला आहे. १ जूनपासून पानशेत धरण खोऱ्यात ६०९ मि.मी., वरसगाव ६३० मि.मी., टेमघर ४ मि.मी., खडकवासला ७ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे.पानशेत धरणाची क्षमता १०.६५ टीएमसी आहे. दि.१३ जुलैअखेर धरणात ४.९९ टीएमसी साठा आहे. तर वरसगाव धरणाची क्षमता १२.८२ टीएमसी आहे व सध्या २.७०टीएमसी पाणी शिल्लक आहे. तर टेमघर ची क्षमता ३ टीऐमसी असून सध्या ०.३०% पाणी आहे. तर शेवटच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९९ टीएमसी असून सध्या ०.५१% पाणी शिल्लक आहे.