शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

काही जातींचा समावेश भटक्या जमातींमध्ये, बहुजन कल्याण विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 14:35 IST

राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार हडगर या जातीचा समावेश विशेष मागास प्रवर्ग यादीतील अनुक्रमांक ३ (१) कोष्टी जातीची तत्सम जात म्हणून करण्यात आला आहे.

मुंबई : राज्याच्या इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाने काही जातींचा भटक्या जमातींमध्ये समावेश करण्यास मान्यता दिल्याने या जातींना दिलासा मिळाला आहे. केवट-तागवाले, तागवाली, तागवाले, तागवाला या जातींचा भटक्या जमातींमध्ये (ब) समावेश करण्यात आला आहे. 

राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग यादीत अनुक्रमांक १८२ वर नमूद मायी, बागवान, राईन (बागवान) (मुस्लीमधर्मीय) यांच्यासमोर कुंजडा (मुस्लीमधर्मीय) या जातींचा समावेश करण्यात आला आहे. तर इतर मागासवर्ग यादीतील अनुक्रमांक २६७ वर समाविष्ट असलेल्या चुनारी जातीसमोर चुनेवाला, चुनेवाले या जातींचा भटक्या जमातींमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार हडगर या जातीचा समावेश विशेष मागास प्रवर्ग यादीतील अनुक्रमांक ३ (१) कोष्टी जातीची तत्सम जात म्हणून करण्यात आला आहे. तसेच वंजारी या मुख्य जातीची लाड वंजारी ही पोटजात म्हणून भटक्या जमाती (ड) अनुक्रमांक ३० मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. इतर मागास प्रवर्गातील अनुक्रमांक २२६ वरील भोयर जातीची आजमितीस असलेली दुबार नोंद वगळण्यात आली आहे. हा बदल शासन निर्णयाच्या दिवसापासून (६ ऑगस्ट) लागू करण्यात आला आहे. ठेलारी ही जात राज्य सरकारच्या भटक्या जमाती (ब) यादीतील क्रमांक २७ मधून वगळून भटक्या जमाती (क) यादीतील क्रमांक २९ मध्ये धनगर या जातीची तत्सम जात म्हणून समाविष्ट करण्यात आली आहे. 

मागासलेपणाचा सखोल अभ्यासया संदर्भातील शिफारशी राज्य मागासवर्ग आयोगाने केल्या होत्या. त्यानंतर शिफारशींवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने विचार करून मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिल्यानंतर मंगळवारी शासन निर्णय जारी करण्यात आला. मागासवर्ग आयोगाने सखोल अभ्यास करून राज्य सरकारला शिफारशी केल्या होत्या.