शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मूळ तक्रारदार खडसेंचाही प्रतिवादींमध्ये समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 05:50 IST

यावल पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीचा प्रथम माहिती अहवाल (एफआआर) रद्द करण्याची विनंती करणाऱ्या सामाजिक

औरंगाबाद : यावल पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीचा प्रथम माहिती अहवाल (एफआआर) रद्द करण्याची विनंती करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या याचिकेत मूळ तक्रारदार तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचाही प्रतिवादींमध्ये समावेश करण्याचे निर्देश न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठाने शुक्रवारी दिले.इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश देत खंडपीठाने याचिकेची पुढील सुनावणी ५ जुलै रोजी ठेवली आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांचे जनसंपर्क अधिकारी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात आपण एकनाथ खडसे यांच्याकडे पैसे ठेवायचे आणि त्यांना ट्रॅपमध्ये अडकवायचे अशी आॅफर अंजली दमानिया यांनी आपल्याला दिली होती, असा दावा केला होता. या मुलाखतीआधारे एकनाथ खडसे यांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले होते. काहीही घडलेलेच नाही, त्यामुळे एफआयआर रद्द करावा, अशी विनंती तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक सुनावणीवेळी करण्यात आली. या प्रकरणात राज्य शासन आणि मुक्ताईनगर पोलीस यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. दमानिया यांच्यातर्फे अ‍ॅड. सतेज जाधव, खडसे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ विनायक दीक्षित काम पाहत आहेत.