शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये आणखी एका शाळकरी मुलीची वेणी कापल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 19:31 IST

पंधरा दिवसापासून शहरात वेणी कापण्याचे सुरू झालेले प्रकार थांबायला तयार नाहीत. पडेगाव परिसरातील कोमलनगरातील बंद घरात झोपलेल्या   मुलीची वेणी  कापलेली आढळली. वेणी कापण्याची शहरातील ही चौथी घटना आहे.  माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र रात्री उशीरापर्यंत तक्रार करण्यासाठी मुलीचे कुटुंब पुढे आले नव्हते.

ठळक मुद्देपडेगाव येथील प्रकार, शहरातील चौथी घटनाघटना पहिली: १८ आॅगस्ट रोजी छावणी आठवडी बाजारात महिलेची वेणी कापली.घटना दुसरी: २१ आॅगस्ट रोजी रेल्वेस्टेशन परिसरातील जहागिरदार कॉलनी घरात झोपलेल्या मुलीची वेणी कापली.तिस-या घटना:  २८ आॅगस्ट रोजी रात्री शहानुरवाडी परिसरातील शम्सनगर येथे घरात झोपलेल्या दोन मुलींची वेणी कापली.

औरंगाबाद, दि. 4 : पंधरा दिवसापासून शहरात वेणी कापण्याचे सुरू झालेले प्रकार थांबायला तयार नाहीत. पडेगाव परिसरातील कोमलनगरातील बंद घरात झोपलेल्या   मुलीची वेणी  कापलेली आढळली. वेणी कापण्याची शहरातील ही चौथी घटना आहे.  माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र रात्री उशीरापर्यंत तक्रार करण्यासाठी मुलीचे कुटुंब पुढे आले नव्हते. 

उत्तर भारतातील अनेक ठिकाणी वेणी कापण्याच्या घटना घडल्याच्या बातम्या टिव्ही चॅनल्सवर झळकल्या होत्या. या बातम्यांची चर्चा सुरू असताना  १८ आॅगस्टला छावणीच्या आठवडी बाजारात  महिलेची अर्धी वेणी कापण्याची पहिली घटना घडली. यानंतर रेल्वेस्टेशन परिसरातील जहागीरदार कॉलनी आणि शहानुरमिया दर्गा परिसरातील शम्सनगर येथील दोन मुलींचे झोपेतच कोणीतरी केस कापले. विशेष म्हणजे या दोन्ही घटना घर आतून बंद असतांना घडल्या. विशेष म्हणजे त्यावेळी घरात त्यांचे नातेवाईकही उपस्थित होते.

 अशीच घटना पडेगाव मधील कोमलनगरात ४ सप्टेंबर रोजी रात्री अनिल निभोरे यांच्या घरात घडली. निंभोरे हे सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम करतात. त्यांना १६ वर्षाचा मुलगा आणि १३ वर्षाची ८वीमध्ये शिकणारी मुलगी आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे घर आतून बंद करून निंभोरे कुटुंब झोपले. सोमवारी सकाळी  झोपेतून जागे झाले तेव्हा मुलीची वेणी कापलेली दिसली.  वेणीचे केस जमिनीवर पडलेले पाहून निंभोरे कुटुंबियांना धक्काच बसला. त्यांचे घर आणि खिडक्या आतून बंद होत्या. बाहेरून कोणीही माणूस आत आला नाही असे असताना मुलीचे केस कापण्यात आले होते. ही बाब कळताच छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक इंदलसिंग बहुरे आणि कर्मचा-यांनी कोमलनगरात जाऊन निंभोरे कुटुंबाकडून घटनेची माहिती जाणून घेतली. शिवाय याबाबत तक्रार करण्यासाठी ठाण्यात या, असे सांगितले. मात्र रात्री उशीरापर्यंत त्यांनी तक्रार दिली नसल्याचे पो.नि.बहुरे यांनी सांगितले.

यापूर्वी घडलेल्या घटनाघटना पहिली: १८ आॅगस्ट रोजी छावणी आठवडी बाजारात महिलेची वेणी कापली.घटना दुसरी: २१ आॅगस्ट रोजी रेल्वेस्टेशन परिसरातील जहागिरदार कॉलनी घरात झोपलेल्या मुलीची वेणी कापली.तिस-या घटना:  २८ आॅगस्ट रोजी रात्री शहानुरवाडी परिसरातील शम्सनगर येथे घरात झोपलेल्या दोन मुलींची वेणी कापली.