मुंबई : शहर आणि उपनगरांत सुरू असलेल्या पावसाच्या माऱ्यामुळे ३९ ठिकाणी झाडे पडली, १३ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले, ५ घरांच्या भिंतीचा भाग पडला असून, धारावीमध्ये बाल्कनीचा भाग कोसळून लहान मुलगी किरकोळ जखमी झाली. बोरीवलीमधील मगर तलावात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. निकुंज गुरव (१७) असे त्याचे नाव आहे.गेल्या २४ तासांत शहरात २१.६४ मिलीमीटर, पूर्व उपनगरात ३७.६३ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात २९.८३ मिलीमीटर पाऊस पडला. सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास धारावीमधील कुंभारवाड्यातील इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळून एक लहान मुलगी किरकोळ जखमी झाली.बोरीवली येथील मगर तलावात बुडालेल्या निकुंज गुरव (१७) याचा मृत्यू झाला असून, त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. शहरात १५, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात २२ एकूण ३९ ठिकाणी झाडे पडली. शहरात २, पूर्व उपनगरात २, पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ५ ठिकाणी घराचा भाग पडला. शहरात ५, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ७ अशा एकूण १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग, सिद्धिविनायक मंदिराकडील रस्ता, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, मशीद बंदर आणि दादर पश्चिमेकडील प्लाझा सिनेमासमोर वाहतूककोंडी झाली होती. (प्रतिनिधी)
शहरात मुसळधार पावसामुळे पडझड, नुकसान सुरूच
By admin | Updated: August 3, 2016 05:36 IST