शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!
4
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
5
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
6
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
7
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
8
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
9
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत, खडकवासलामधून अडीच हजार क्युसेक्स विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:21 IST

पुणे शहर व परिसरात सोमवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून, उपनगरांमध्ये जोरदार वर्षाव होत होता. यामुळे अनेक रस्ते जलमय झाले़ दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले़

पुणे : पुणे शहर व परिसरात सोमवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून, उपनगरांमध्ये जोरदार वर्षाव होत होता. यामुळे अनेक रस्ते जलमय झाले. दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. खडकवासला, धनकवडी, कात्रज, सिंहगड रोड परिसरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला होता. शहरात सकाळी अकरानंतर पावसाची संततधार सुरू होती. सायंकाळी त्याचा जोर कमी झाला. पाऊस व वा-यामुळे मंगळवारी दिवसभरात १७ झाडपडीच्या घटना घडल्या़ कोंढव्यातील लुल्लानगर आणि शिवाजीनगर पोलीसलाइन येथे झाड पडल्याने मोटारी व दुचाकींचे नुकसान झाले़ मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुणे वेधशाळेत ९ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १९ मिमी पावसाची नोंद झाली होती़ धरणात पावसाचे पाणी येण्याचे प्रमाण वाढल्याने सायंकाळी खडकवासला धरणातून २ हजार ५६८ क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यास सुरुवात करण्यात आली.कात्रज येथे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १९़८ मिमी पाऊस पडला होता़ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १४़२ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेले काही दिवस शहराच्या उपनगरात रात्री जोरदार पाऊस पडत आहे़ मंगळवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढू लागला होता.विशेषत: सिंहगड रोड, खडकवासला, कोथरूड या परिसरात पावसाचा जोर जास्त होता. दुपारनंतर शहरातील पावसाची संततधार सुरू झाली़ मधूनच एखादी जोरदार सर येत होती़ त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून, सिग्नल बंद पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचे दिसून येत आहे़ शहरात मंगळवारी दिवसभरात एकूण १७ झाडपडीच्या घटना घडल्या़ त्यातील अनेक झाडे ही रस्त्यावर पडल्याने त्या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती़ बिबवेवाडी येथील गावठाण कमानीजवळ विजेच्या तारांवर झाडाची फांदी पडल्याने सकाळी या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता़>शिवतीर्थनगर, वारजे व हडपसर येथे मोटारीवर झाड पडल्याने नुकसान वारजे येथील श्वेतगंगा सोसायटी; तसेच कोरेगाव पार्कमधील लेनडी येथे पार्क केलेल्या मोटारींवर झाड पडल्याने काही गाड्यांचे नुकसान झाले़ औंध येथील भाऊ पाटील रोड, हडपसर येथील ससाणेनगरमधील साधना बँक चौकात झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती़ कसबा पेठेतील साततोटी पोलीस चौकीजवळ रस्त्यावर झाडाची फांदी पडली; तसेच पद्मावतीतील संगम सोसायटी, पौड रोडवरील शिवतीर्थनगर कमान येथे झाडे उन्मळून रस्त्यावर पडली होती़ याशिवाय वैकुंठ स्मशानभूमी, फुलवाला चौक, सहकारनगर फेज २ मधील सहानंद सोसायटी, सॅलिसबरी पार्कमधील जैन मंदिर येथे झाडपडीच्या घटना घडल्या़ अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी जाऊन रस्त्यावरील फांद्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करून दिली़

>जिल्ह्यातील ९ धरणांमधून विसर्ग सुरूपुणे : सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील २५ पैकी १६ धरणे शंभर टक्के भरली असून, इतर धरणेही जवळपास भरण्याच्या स्थितीमध्ये आली आहेत. त्यामुळे ९ धरणांतून नदीत पाणी सोडण्यात येत आहे़ खडकवासला धरणातून २ हजार ५६८ क्युसेक्स पाणी नदीत सोडले आहे़ उजनी धरण १०८ टक्के भरले असून, त्यातून ५ हजार क्युसेक्स पाणी भीमा नदीत सोडले जात आहे़ खडकवासला साखळी धरणातील पानशेत, वरसगाव, खडकवासला ही तीनही धरणे १०० टक्के भरली आहेत़ पानशेत धरणातून पॉवर हाऊससाठी ६१० क्युसेक्स, वरसगावमधून ५८० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. टेमघर धरणातून गळती होत असल्याने त्यात ५५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा करण्यात आला आहे. दिवसभरात टेमघर धरण क्षेत्रात १८, वरसगाव ३२, पानशेत ३३ आणि खडकवासला धरण परिसरात १६ मिमी पाऊस झाला़ धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक वाढल्यास आणखी पाणी सोडले जाणार आहे, असे खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले.जिल्ह्यातील वडज, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, नीरा देवघर, भाटघर, वीर आणि उजनी ही धरणे १०० टक्के भरली आहेत़ डिंभे धरणातून १७१०, कळमोडी ७८, भामा आसखेड ५५३, आंद्रा ५३, गुंजवणी ४७४, भाटघर १६६७, वीर १३ हजार ९११ आणि उजनी धरणातून ५ हजार क्युसेक्स पाणी सोडले जात आहे़ याशिवाय उजनी धरणातून उजवा कालवा १८००, बोगद्यातून ४०० आणि पॉवर हाऊससाठी १५०० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे़