शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात विद्यार्थ्यांसाठी ५५१ विज्ञान केंद्रे , पहिल्या आदिवासी विज्ञान केंद्राचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 18:49 IST

ग्रामीण भागातील व आदिवासी क्षेत्रातील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी येत्या काही महिन्यांत राज्यात ५५१ विज्ञान केंद्र्रे उभरणार असल्याची माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी नजीकच्या गुरुकुंज मोझरी येथे दिली.

तिवसा (अमरावती) : ग्रामीण भागातील व आदिवासी क्षेत्रातील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी येत्या काही महिन्यांत राज्यात ५५१ विज्ञान केंद्र्रे उभरणार असल्याची माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी नजीकच्या गुरुकुंज मोझरी येथे दिली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे राज्यातील पहिले किलबिल विज्ञान केंद्र व तारांगणचे उद्घाटन करण्यात आले. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विकासासाठी प्रत्येक तालुक्यात केंद्र स्थापन होईल. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या तालुक्यांमध्ये दोन विज्ञान केंद्रे स्थापन केली जातील, असे ते म्हणाले. यावेळी आदिवासी विकास विभाग (नागपूर)च्या अप्पर आयुक्त माधवी खोडे यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली. आदिवासी विभागात जास्तीत जास्त विज्ञान केंद्रे व्हावीत, यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सचिव जनार्दनपंत बोथे, खगोल शास्त्रज्ञ नंदकिशोर कासार, दिलीप काळे, सुभाष गवई, मधुकर गुंबळे उपस्थित होते. यानिमित्ताने नंदकुमार व अन्य मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.