शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत तडाखा कायम, तापमान ३८ अंशांवर; हाेरपळ, काहिली आणखी वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 07:30 IST

देशातील अनेक राज्यात काही आठवड्यांपासून आलेली उष्णतेची लाट या आठवड्याच्या अखेरीस आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

नागपूर/मुंबई : राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट आली असून,  शुक्रवारचा दिवस विदर्भातील नागरिकांची परीक्षा पाहणारा ठरला. विदर्भातील सात शहरांमध्ये पारा ४५ अंशांच्या वर गेला असून, चंद्रपुरात सर्वाधित ४६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. शनिवारीही विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’ असून, तापमानात आणखी वाढू शकते.  मुंबईत तडाखा कायम आहे. तापमान ३८ अंशांवर पाेहाेचले आहे. गडचिरोली वगळता इतर सर्वच ठिकाणी मागील २४ तासांत पाऱ्यात ०.३ ते ०.९ अंश सेल्सिअसने वाढ झाली. अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व यवतमाळ येथे तापमान ४५ अंशांहून अधिक होते. 

दिल्लीत ७२ वर्षांतील दुसरा सर्वात उष्ण एप्रिलदेशातील अनेक राज्यात काही आठवड्यांपासून आलेली उष्णतेची लाट या आठवड्याच्या अखेरीस आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये मागील ७२ वर्षांतील दुसरा सर्वात उष्ण एप्रिल महिना म्हणून चालू महिन्याची नोंद झाली आहे. दिल्ली परिसरात शुक्रवारी ४६ अंश सेल्सिअस तापमान होते. उष्णतेच्या लाटेमुळे हवामान खात्याने राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिसा या राज्यांना गुरुवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातही उन्हाळा आणखी कडक झाला. देशाच्या मध्य व उत्तर - पश्चिम भागात आगामी पाच दिवस उष्णतेच्या लाटेची तीव्रता कायम राहील. हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान या ठिकाणी उद्या धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Temperatureतापमान