शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये इन्कम टॅक्सचे कांदा व्यापाऱ्यांवर छापे; कांद्याच्या दरात झाली ३५ टक्क्यांनी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 13:45 IST

नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांची घरं, कार्यालयं आणि कांद्याची खळे येथे  गुरुवारी सकाळी इन्कम टॅक्स विभागाने छापे मारले होते.

ठळक मुद्दे नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांची घरं, कार्यालयं आणि कांद्याची खळे येथे  गुरुवारी सकाळी इन्कम टॅक्स विभागाने छापे मारले होते.इन्कम टॅक्स विभागाच्या या छापेमारीनंतर घाऊक बाजारात कांद्याचे दर तब्बल ३५ टक्क्यांनी घसरले आहेत. . इन्कम टॅक्स विभागाने नाशिक जिल्ह्यातील सात व्यापाऱ्यांची घरं, कार्यालयांवरर छापे मारले होते.

नाशिक, दि. 15- नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांची घरं, कार्यालयं आणि कांद्याची खळे येथे  गुरुवारी सकाळी इन्कम टॅक्स विभागाने छापे मारले होते. इन्कम टॅक्स विभागाच्या या छापेमारीनंतर घाऊक बाजारात कांद्याचे दर तब्बल ३५ टक्क्यांनी घसरले आहेत. इन्कम टॅक्स विभागाने नाशिक जिल्ह्यातील सात व्यापाऱ्यांची घरं, कार्यालयांवर छापे मारले होते. या छापेमारीमुळे घाऊक बाजारातील कांद्याचे दर घसरले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक बाजारात कांद्याचे दर ३५ टक्क्यांनी घसरले असल्याची माहिती समोर येते आहे. बुधवारी कांद्याचा भाव प्रतिक्विंटल १४०० रुपये होता. तो दुसऱ्या दिवशी सरासरी ९०० रुपयांपर्यंत पोहोचला. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये तर कमाल १३३१ रुपये भाव मिळाला. नाशिकमधील सात कांदा व्यापाऱ्यांच्या घरांवर इन्कम टॅक्स विभागाने छापे मारले. त्यांची घरं, कार्यालये आणि गोदामांची तपासणी करण्यात आली. इन्कम टॅक्स विभागाच्या या कारवाईमुळे कांदा व्यापार बाजारात एकच खळबळ उडाली. त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला. घाऊक बाजारात कांद्याचे दर घसरले, अशी माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सूत्रांनी दिली. घाऊक बाजारातील कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी कमी किंमतीत त्यांच्याकडचा माल विकायला नकार दिला. त्यामुळे कांद्याचा लिलाव बंद पडला.

गुरूवारी इन्कम टॅक्स विभागाने नाशिकमधील सात कांदा व्यापाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केली. या सातपैकी दोन जण लासलगावमधील आहेत. बाजार समितीमध्ये येणाऱ्या मालापैकी तीस टक्के माल विकत घ्यायची क्षमता त्या व्यापाऱ्यांची आहे, अशी माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी दिली आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या या कारवाईमुळे कांदा व्यापार बाजारात एकच खळबळ उडाली. त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला. घाऊक बाजारात कांद्याचे दर घसरले, असंही ते पुढे म्हणाले. घाऊक बाजारातील कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी कमी किंमतीत त्यांच्याकडचा माल विकायला नकार दिला. त्यामुळे कांद्याचा लिलाव बंद पडला, असंही त्यांनी सांगितलं. पिंपळगाव, लासलगाव, सटाणा, कळवण, उमराणा, येवला, चांदवड येथील कांदा व्यापाऱ्यांवर इन्कम टॅक्स विभागाने गुरूवारी कारवाई केली. कांद्याचा साठा करून पैसे कमावल्याच्या संशयावरून ही कारवाई झाल्याचं समजतं आहे.   

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स