शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या बॅगमध्ये विमानतळावर सापडली लाखोंची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 08:13 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया व शासकीय कंत्राटदार सुमित बाजोरिया यांच्या यवतमाळ येथील बालाजी चौकातील कार्यालयावर मंगळवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यवतमाळ/नागपूर/मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया व शासकीय कंत्राटदार सुमित बाजोरिया यांच्या यवतमाळ येथील बालाजी चौकातील कार्यालयावर मंगळवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.प्राप्त माहितीनुसार, संदीप बाजोरिया हे एक कोटीची रक्कम घेऊन सोमवारी नागपूरवरून विमानाने मुंबईला गेले. त्यांच्याकडे रोकड असल्याची बाब नागपूर विमानतळावर थोडी उशिराने लक्षात आली. तसे मुंबई विमानतळ प्रशासनाला सूचित करण्यात आले. तेथे बाजोरिया यांची रात्री २ वाजेपर्यंत अधिकाऱ्यांनी चौकशी केली.एक कोटी रक्कम आपल्या वहीखात्याची असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने प्राप्तिकर अधिका-यांनी सोमवारी रात्रीेच पोलीस बंदोबस्तात त्यांचे बालाजी चौकातील कार्यालय गाठले, परंतु सूर्यास्तानंतर छापा टाकण्याची परवानगी नसल्याने अधिका-यांनी ‘रेकॉर्ड’शी छेडछाड होऊ नये, म्हणून बाजोरिया यांच्या कार्यालयाबाहेर रात्रभर पोलिसांसह पहारा दिला. मंगळवारीसकाळी कागदपत्रांची तपासणी केली. संदीप बाजोरिया यांना ताब्यात घेतल्याचे कळताच त्यांचे भाऊ सुमित बाजोरिया हे मुंबईला गेले होते. छाप्याची माहिती मिळताच मंगळवारी दुपारी १२ वाजता ते यवतमाळात दाखल झाले. अधिका-यांकडून त्यांचीही चौकशी केली जात आहे. छाप्याची कारवाई दिवसभर सुरू होती. बाजोरिया यांच्या बंगल्यातही प्राप्तीकर अधिका-यांनी तपासणी केल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याबाबत अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही.नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ संचालक विजय मुळेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित घटनेची माहिती नसल्याचे सांगितले.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे बाजोरिया यांच्यावर सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप झाले असून, मध्यंतरी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्यांची विधान परिषदेच्या सभापतींच्या दालनाबाहेर वादावादी झाली होती आणि प्रकरण हातघाईवर आले होते. सिंचन घोटाळ्यात त्यांच्या कंपनीविरोधात जानेवारी महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सर्व काही नियमानुसारसापडलेल्या रकमेची नोंद आहे. बँकेतून रक्कम काढल्याचे पुरावे अधिका-यांना सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे शंकेला कोणताही वाव नाही. सर्व नियमानुसार असल्याचे कंत्राटदार सुमित बाजोरिया यांनी सांगितले.

टॅग्स :YavatmalयवतमाळIncome Taxइन्कम टॅक्स