शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
3
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
4
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
5
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
6
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
7
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
8
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
9
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
10
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
11
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
12
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
13
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
14
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
15
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
16
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
17
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
18
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
19
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
Daily Top 2Weekly Top 5

डाळीच्या अवैध साठ्यांवर छापे

By admin | Updated: October 22, 2015 01:58 IST

राज्यात डाळींच्या अवैध साठ्याविरोधात छापे टाकण्यात येत असतानाच ठाणे जिल्हा पुरवठा विभागाने रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण अशा ८ ठिकाणी धाडी टाकल्या.

ठाणे : राज्यात डाळींच्या अवैध साठ्याविरोधात छापे टाकण्यात येत असतानाच ठाणे जिल्हा पुरवठा विभागाने रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण अशा ८ ठिकाणी धाडी टाकल्या. यावेळी तेथून १० हजार मेट्रीक टनापेक्षा अधिक डाळींचा साठा जप्त केल्याची माहिती ठाणे जिल्हा पुरवठा विभागाने दिली. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत डाळी, खाद्यतेलांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू असून, दसरा-दिवाळीच्या तोंडावर अचानक किमती आणखी वाढल्याने जनतेतील वाढता रोष लक्षात घेऊन, राज्य सरकारने साठेबाजांवर धडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, कोकण विभागीय उपायुक्त आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा पुरवठा विभागाने स्वतंत्र भरारी पथके स्थापन करून व्यापाऱ्यांची गोदामे, तसेच दुकानांची झडती सुरू केली. मंगळवारी पहिल्याच दिवशी ८ ठिकाणी धाडी टाकून १० हजार २३६.०६ मेट्रीक डाळींचा साठा जप्त केला. यात उरणमध्ये पी.पी. वेअर हाऊस येथून ७९० क्विंटल, पनवेलमधून आकाश वेअर हाऊस, अजिवली व केअरटेकर शक्ती वेअर हाऊस, अरिवली या दोन ठिकाणांवरून ३०१२ क्विंटल, अक्षय कमर्शिअल कॉम्प्लेक्स व बीएलआर लॉजिक, डेरवली गावांतून २२,९८६ क्विंटल,अक्षय वेअर हाऊसिंगमधून २९,७६७ क्विंटल, अक्षय कमर्शिअल डेरवली येथून २५,२९४ क्विंटल, ईटीजी प्रा. वेअर हाऊस,कळंबोली २०,५११ क्विंटल, तसेच सोहनलाल कमोडिटीज येथे काही आढळून आलेले नसल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली. कपड्यांचा साठास्वतंत्र भरारी पथकात भिवंडी, पेण, मुरबाड,कर्जत,शहापूर अंबरनाथ आणि खालापूर येथील पुरवठा निरीक्षक आणि अव्वल कारकुनांचा समावेश होता. या नऊ पथकांनी या धाडी टाकल्या असून मुरबाड आणि खालापूर पुरवठा निरीक्षकांनी टाकलेल्या छाप्यात कपड्यांचा साठा आणि दुचाकी निदर्शनास आल्या आहेत.शहापुरात मसूरडाळीचा साठा जप्तआसनगाव इंडस्ट्रीमधील गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या डाळींच्या गोदामावर अचानक शहापूर तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी छापा घालून, तब्बल सव्वा कोटीची मसूरडाळ व इतर डाळी जप्त करून शेकडो गोण्या ताब्यात घेतल्या. बुधवारी पहाटे ३ च्या सुमारास तहसीलदारांनी पथकासह मे. बाफना कमोडिटी, मे. ताज अ‍ॅग्रो इंडस्ट्री यांच्या गोदामावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने छापा टाकला.त्यात मे. बाफना या गोदामात या वेळी ३९६ गोण्यांत ३२,१६० किलो वजनाची, बाहेर उभ्या स्थितीत असलेल्या कंटेनरमध्ये २४,६०० किलो, दुसऱ्या कंटेनरमध्ये २५,३०० असा एकूण दोन्ही कंटेनरमधून ४९,९०० किलो तर एकूण गोदामातील माल ८२,०६० किलो मसूरडाळ व अखंड मसूर यांची अंदाजे बाजारपेठेतील किंमत ४९ लाख २३ हजार ६०० रु पये आहे. दुसरे मे. ताज अ‍ॅग्रो या गोदामात ६९० गोण्यांत ३४,९५० किलो, तर सुटे वजन १ लाख ४६ हजार किलो वजनाचा अंदाजे ६२ लाख ७८ हजार ४०० रुपये किमतीचा माल जप्त करून जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे बाफनाचे व्यवस्थापक राजेंद्र पन्नालाल जैन व ताज अ‍ॅग्रोचे व्यवस्थापक विजय रामविजय यादव यांच्यावर गुन्हे दाखल केले. जोपर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत पकडलेला माल गोदामातून हलवण्यास मनाई केलेली आहे, असे शहापूरचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी सांगितले. कोकण विभाग उपायुक्तांनी स्वतंत्र भरारी पथक स्थापन करून पनवेल आणि उरण येथेही ८ छापे टाकले. यामधील ६ ठिकाणच्या छाप्यांत १० हजार २३६.०६ मेट्रीक टन कडधान्य एकत्रित डाळीचा साठा जप्त केला आहे, तर पनवेलमधील दोन्ही ठिकाणी गोडाऊनमध्ये कपड्यांचा साठा आणि दुचाकी आढळल्या आहेत, तसेच शहापुरात दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीप्रकरणी बाफनाचे व्यवस्थापक व ताज अ‍ॅग्रो व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल केले आहेत.- मोहन नळदकर, ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारीआम्ही पनवेल तालुक्यातील संभाव्य डाळीचा साठा करणाऱ्या वेअर हाऊसची झडती घेतली. त्यामध्ये मर्यादेपेक्षा अधिक डाळीचा साठा आढळला असून हा प्राथमिक अंदाज आहे. त्यानुसार आम्ही संबंधित पोलीस ठाण्यात तक्र ारी दिली आहे. त्यानुसार पोलीस यंत्रणा तपास करेल. त्यानंतर नेमकी तफावत त्याचबरोबर साठेबाजीबाबत इत्थंभूत माहिती मिळेल.- शशिकांत वाघमारे, पुरवठा अधिकारी, पनवेल तालुका