शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचा प्रभाव : मराठा आरक्षण पुन्हा ऐरणीवर; सरकारला इशारा, सोशल मीडियावरही जोर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 07:05 IST

गुजरात निवडणुकीमध्ये पाटीदार समाजाने भारतीय जनता पार्टीला दिलेल्या धक्क्यानंतर महाराष्ट्रात मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात ठिकठिकाणी आरक्षणाची मागणी करणारे बॅनर झळकावत सोशल मीडियावरही मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे.

मुंबई : गुजरात निवडणुकीमध्ये पाटीदार समाजाने भारतीय जनता पार्टीला दिलेल्या धक्क्यानंतर महाराष्ट्रात मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात ठिकठिकाणी आरक्षणाची मागणी करणारे बॅनर झळकावत सोशल मीडियावरही मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे.मराठा क्रांती मोर्चाचे नवी मुंबईचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी थेट खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनाच प्रश्न विचारला आहे. मुंबईतील महामोर्चादरम्यान मध्यस्थीची भूमिका घेणारे संभाजीराजे यांना मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांचा विसर पडला आहे का? असा प्रश्न पोखरकर यांनी उपस्थित केला आहे. याआधी शिवसेना आमदारांनी नागपूर अधिवेशनाच्या दुस-याच दिवशी विधानभवन परिसरात उपोषण करत मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत तत्काळ आरक्षण लागू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर लागलेल्या गुजरात निवडणुकीच्या निकालात भाजपाची झालेली पिछेहाट पाहून, आता मराठा समाजाने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. त्यात विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे.गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर पुढील वर्षी जाहीर होणा-या राज्यातील निवडणुकांना सामोरे जायचे असेल, तर आताच सावध होण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा