शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

कट प्रॅक्टीसला ‘आयएमए’चा तीव्र विरोध

By admin | Updated: August 24, 2014 01:07 IST

इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (आयएमए) डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंध वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विविध सामाजिक विषयांवर आयएमएने उपक्रम राबविले आहेत.

दिलीप सारडा : १५ टक्के डॉक्टरांमुळे वैद्यकीय क्षेत्र बदनामयवतमाळ : इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (आयएमए) डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंध वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विविध सामाजिक विषयांवर आयएमएने उपक्रम राबविले आहेत. मात्र अद्यापही १५ टक्के डॉक्टर कट प्रॅक्टीस करीत असल्याने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रच बदनाम झाले आहे, अशी टीका आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. दिलीप सारडा यांनी केली. शनिवारी यवतमाळ दौऱ्यावर आले असता ते पत्रपरिषदेत बोलत होते. डॉ. सारडा म्हणाले, आयएमएने पुढाकार घेऊन कट प्रॅक्टीसबाबत मोहिम हाती घेतली. महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलने चौकशी करून कारवाई केली. यामुळे कट प्रॅक्टीसवर बऱ्याचअंशी आळा बसला. आता आयएमएच्या प्रयत्नाने १५ टक्के रेफरन्स कमी झाल्याचे रेडिओलॉजीच्या सर्व्हेत उघड झाले आहे. डॉक्टरांनी विदेश दौरा, विविध वस्तू घेणे चुकीचे आहे. डीएमएलटी, सीएमएलटी यांना रक्त तपासण्याचा अधिकार नाही. अधिकृत डॉक्टरांच्या अधिनस्त ते काम करू शकतात, असे पॅथॉलॉजीकल असोसिएशनचे म्हणने असल्याचे डॉ. सारडा यांनी सांगितले. आरोग्य संवर्धनासाठी आयएमएकडून सायकल क्लब ही संकल्पना राबविली जात आहे. पुणे, नागपूर, चंद्रपूर येथे क्लब स्थापन केले आहेत. यवतमाळातही डॉ. सुरेंद्र भुयार आणि डॉ. दिलीप सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनात सायकल क्लब निर्माण केला जाणार आहे. आयएमएने ‘आओ गांव चले’ संकल्पना राबविली आहे. प्रत्येक शाखेकडून एक गाव दत्तक घेण्यात आले आहे, असे नियोजित राज्याध्यक्ष डॉ. राठोड यांनी सांगितले. पत्रपरिषदेला आयएमएचे सचिव डॉ. जयेश लेले, उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, यवतमाळ शाखा अध्यक्ष डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ. सी.बी. अग्रवाल, डॉ. दिलीप देशमुख, डॉ. दिलीप सव्वालाखे, डॉ. नारायण पुराणिक उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)असा आहे क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्टडॉक्टर्स आणि रुग्ण यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणारा क्लिनीकल इस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट डिसेंबरमध्ये येऊ घातला असून यातील तरतुदींबाबत डॉ. दिलीप सारडा यांनी पत्रकारांशी चर्चा केली. ते म्हणाले, या कायद्यात डॉक्टरांनी प्रिस्क्रीप्शन लिहिताना कॅपीटल लेटरचाच उपयोग करावा. दोन लेटरपॅड वापरावे, त्यावर नाव, डीग्री, पॅथी, रजिस्ट्रेशन नंबर आणि पेशंटचे नाव व त्याची इतर ओळख नमूद करावी. शक्यतोवर डॉक्टरांनी जेनेरिक औषधीच लिहून द्यावी. डॉक्टरांनी हे औषध लिहण्यास सुरूवात केल्यानंतर त्याचे स्थानिक पातळीवरही दुकान लागेल. जेनेरिक औषधींचे दर २० पटींनी कमी आहेत. आता डॉक्टरांनी प्रीस्क्रिप्शनमध्ये जेनेरिक औषध लिहिनेही आवश्यक आहे. नवीन कायद्यानुसार हॉस्पीटलच्या वीज दरात सवलत दिली जाणार आहे. व्यावसायीक दरापेक्षा कमी दर राहणार आहेत. शिवाय शॉप अ‍ॅक्टच्या अटी क्लिनिकला लागू होणार नाही. डॉक्टरांना चाचण्यांसाठी रुग्ण अधिकृत असलेल्याच डॉक्टरकडे पाठविणे बंधनकारक राहणार आहेत.