शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

खैरेंच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहणार, आमदार हर्षवर्धन जाधव यांनी ग्वाही देत वाद मिटल्याची केली घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 18:58 IST

एकमेकांवर चिखलफेक करत पाण्यात पाहणारे खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार हर्षवर्धन यांच्या समेट झाल्याची घोषणा दोघांनीही नवनिर्वाचीत सरपंचांच्या सत्कार समारंभात दिली.

ठळक मुद्देआ. जाधव यांनी आगामी लोकसभा निवडणूकीत खा. खैरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगितले.खैरे यांनी यापुढे जाधव हे केवळ शिवसेनेचे सत्कार स्विकारतील, असा आशावाद व्यक्त केला.

औरंगाबाद, दि. १४ : एकमेकांवर चिखलफेक करत पाण्यात पाहणारे खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार हर्षवर्धन यांच्या समेट झाल्याची घोषणा दोघांनीही नवनिर्वाचीत सरपंचांच्या सत्कार समारंभात दिली. आ. जाधव यांनी आगामी लोकसभा निवडणूकीत खा. खैरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगितले. तर खैरे यांनी यापुढे जाधव हे केवळ शिवसेनेचे सत्कार स्विकारतील, असा आशावाद व्यक्त केला.

शिवसेनेतर्फे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत निवडूण आलेल्या सरपंच आणि सदस्यांच्या सत्काराचे आयोजन तापडिया नाट्यगृहात केले होते. या कार्यक्रमाला अनेक दिवसानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. खा.खैरे यांच्या हस्ते शिवसेना प्रणित गटाकडून निवडूण आलेल ९६ सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार संजय सिरसाठ, हर्षवर्धन जाधव, जि. प. अध्यक्षा देवयाणी डोणगावकर, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, सुहास दशरथे, महापौर पदाचे उमेदवार नंदकुमार घोडेले, कला ओझा, सुनिता आऊलवार, रंजना कुलकर्णी आदी  उपस्थित होते.

या सत्कार समारंभात आ. जाधव यांची उपस्थिती सर्वांनाच कोड्यात टाकणारी होती. आ. जाधव यांनी सर्वात अगोदर बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी आता सर्व वाद निकाली निघाले असल्याचे सांगताच नाट्यगृहात हास्यकल्लोळ निर्माण झाला. शिवसेनेच्या निवडून आलेल्या कन्नड तालुक्यातील सरपंचांना प्रत्येक पाच लाख रूपयांचा आमदार फंड देणार असल्याचे सांगितले. मध्यंतरी खैरे यांच्यासोबत नाराजी होती. त्याची कारणे वेगळी आहेत. ती नाराजी मातोश्रीवर गेल्यामुळे दूर झाली आहे. आता लोकसभा निडणूकीच्या वेळी खैरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही जाधव यांनी दिली.

आमदार सिरसाठ यांनीही शिवसेनेला अंतर्गत कुरघोडीच्या घटना नविन नसल्याचे सांगितले. उलट आ. जाधव यांनी लवकर कळले. तरी कधी खैरे-कदम, खैरे-सिरसाठ, सिरसाठ-दानवे असा संघर्ष झाल्याचे रंगविले जात असल्याचे सिरसाठ म्हणाले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सरपंच निवडणूकीत शिवसेनाच वरचढ ठरल्याचे सांगितले. सरपंचाचा आकडा लवकरच १०० पेक्षा अधिक होईल. सध्या ९६ सरपंच शिवसेनेत आहेत. आणखी पाच-सहा जणांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचेही दानवे म्हणाले. 

शेवटी बोलताना खैरे म्हणाले, ब-याच दिवसांनी पुन्हा सामिल झालेले हर्षवर्धन जाधव यांनी आता शिवसेनेचे सत्कार स्विकारावेत. दुस-या पक्षाच्या मंचावर जाण्याची त्यांना गरज नसल्याचे सांगितले. पक्षात भांडणे चांगली असतात. नुकतीच दोघींची भांडणे (महिला पदाधिका-यांची हाणामारी) झाली होती, या घटनेची आठवणही खैरे यांनी यावेळी करून दिली.

उदयसिंग राजपूत यांचे काय होणार?कन्नड विधानसभाचे आमदार जाधव यांनी उघडपणे बंड केल्यामुळे खा. खैरे यांनी त्यांना पर्याय म्हणून राष्ट्रवादीतुन उदयसिंग राजपूत यांना शिवसेनेत आणले. सरपंचांच्या सत्कार समारंभात मंचावर राजपूत उपस्थित होते. मात्र, आता जाधव व खैरे यांनीच मतभेद संपल्याचे जाहीर केल्यामुळे राजपूत यांचे काय होणार? अशी कुजबूज  कार्यक्रमस्थळी होती.

शिवसेना भवनातुन तंबीजिल्हा शिवसेना शाखेतर्फे आयोजित सरपंचांच्या कार्यक्रमाला सुरूवातीला आ. जाधव यांनी बोलावण्यात आले नव्हते. मात्र शिवसेना भवनातून तंबी मिळाल्यामुळे आ. जाधव यांना बोलावण्यात आले. त्यामुळे खा. खैरे यांचाही नाईलाज झाला. शेवटी आ. जाधव यांना सन्मानाने बोलवावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले. 

काय होता वादखा. खैरे  यांनी कन्नड तालुक्यातील चार गावात निधी दिला. मात्र हा निधी प्रत्यक्ष कामांवर खर्च झालाच नसल्याचा आरोप आ. जाधव यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी चौकशीची मागणीही केली होती. त्याविषयीची पत्रकेही काढली होती. तर शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी खा. खैरे यांच्या बाजूने वादात उडी घेत आ. जाधव यांनीच आमदार निधी कामे  न करताच उचलला असल्याची तक्रार जिल्हाधिका-यांकडे केली होती.