शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

प्राध्यापक भरतीमधील लाचखोरी थांबविण्यासाठी मुलाखतींचे चित्रण- रवींद्र वायकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 02:13 IST

‘लोकमत’ने उघड केले होते गैरप्रकार

मुंबई : शासकीय अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील भरतीप्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी व लाचखोरी थांबविण्यासाठी यापुढे प्राध्यापक भरतीसाठीच्या मुलाखतींचे चित्रीकरण करण्यात येईल, असे आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानपरिषदेत दिले. ‘एमपीएससी’च्या धर्तीवर प्राध्यापक भरतीत ‘सेंट्रलाईज्ड प्रोसेसिंग सिस्टीम’ आणणार असल्याचेही ते म्हणाले.शिवसेना सदस्य मनीषा कायंदे यांनी राज्यातील अनुदानित महाविद्यालयात सुरू असलेल्या प्राध्यापक भरतीत लाचखोरी होत असल्याचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहात मांडला. प्राध्यापक भरतीत एका जागेसाठी संस्थाचालकांनी ४० ते ४५ लाखांची मागणी केल्याचे उघड झाल्याचे कायंदे यांनी सांगितले. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने प्राध्यापक भरतीमधील लाचखोरीचे प्रकार उघड केले होते.चर्चेला उत्तर देताना वायकर म्हणाले की, अकोला ,धुळे शहापूर येथील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षकभरती दरम्यान भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांची चौकशी केली जाईल. चौकशीतील दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन वायकर यांनी दिले.‘वेळेवर वेतन न देणाऱ्या संस्थांवर कारवाई’काही शिक्षण संस्थाचालक प्राध्यापकांना वेळेवर वेतन देत नाही. त्यांची शासनाकडे तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार होत असल्याच्या लक्षवेधी सूचनेत हा उपप्रश्न सदस्य सतीश चव्हाण यांनी मांडला. संबंधित सदस्यांची लवकरच संयुक्त बैठक घेतली जाईल. चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दत्तात्रय सावंत, भाई जगताप, ना. गो. गाणार आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :Ravindra Vaikarरवींद्र वायकर