शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
5
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
6
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
7
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
8
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
9
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
10
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
11
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
12
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
13
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
14
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
15
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
16
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
18
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
19
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
20
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला

अंबाजोगाई येथील दुलर्क्षित लेणी

By admin | Updated: November 1, 2016 20:23 IST

मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे. भौगोलिक परिस्थितीने सुसज्ज असल्याने इतिहासात सातवाहन, चालूक्य, यादव, बहामनी, राष्ट्रकूट

ऑनलाइन लोकमत/ महेश चेमटे

मरणासन्न लेण्या - भाग १

मुंबई, दि. 01 - मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे. भौगोलिक परिस्थितीने सुसज्ज असल्याने इतिहासात सातवाहन, चालूक्य, यादव, बहामनी, राष्ट्रकूट घराण्यांचे अंबाजोगाई आणि पर्यायाने बीडमध्ये प्रस्थ होते. राष्ट्रकूट काळात कर्नाटक, आंध्रप्रदेशात व्यापारासाठी अंबाजोगाई शहराचा वापर होत असे. याच्या खुणा येथील डोंगरात लेण्यांच्या रुपात पाहायला मिळतात. मात्र या लेण्यांची माहिती वा नोंद देखील राज्य पुरातत्व विभागाकडे नसल्याची धक्कादायक माहिती सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ.अनिता राणे-कोठारे यांनी दिली. अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस सीमेजवळील जयंती नदीच्या काठी तीन लेणी सापडतात. त्यात २ शैव आणि एक जैन प्रकाराच्या लेणी आहेत. त्यातील शैव लेणी ही लेणी ‘हत्तीखाना’ म्हणून ओळखला जातो. बहामनी काळात हत्ती पाणी पिण्यासाठी या जागेचा वापर करत असे. पर्वताच्या उतारावरील ही लेणी पाहता पुण्यातील पाताळेश्वर लेण्यांची आठवण येते. तीन लेण्यांपैकी एक शैव लेणी काळाच्या पडद्याआड गेली असून; एक जैन आणि एक शैव लेणी तुर्तास तरी पाहण्याजोगे असल्याचे कोठारी यांनी सांगितले. शैव लेणीमध्ये सभामंडप, एका कातळात कोरलेला नंदी मंडप दिसून येतो. गर्भगृहाबरोबर वास्तव्य करण्यासाठी ३ खोल्या देखील आहेत. चार ओळींमध्ये आठ खांबावर (३२ खांब) लेण्यांचा भार आहे. लेण्यांसमोरील मोकळ््या जागेत मोठ्या पाषणातील चार हत्ती आहेत. चार ही बाजूने प्रवेश करता येण्याजोगे नंदीमंडप येथील आकर्षण ठरते. शेजारील तुटलेला ध्वजस्तंभ गतवैभवाची आठवण करुन देतो. सप्तमात्रिका, तांडव करणारा शिव, महिषासूरमर्दिनी, भैरव, वामन अवतार, त्रिविक्रम, नरसिंह आणि शेषशाही विष्णू यांची शिल्पे पाहताना एलोरा येथील शिल्पांची जाणीव होते. वास्तू दुलर्क्षित असल्याने शिल्पांना मोकळ््या श्वासाची गरज असल्याचे मत कोठारी यांनी व्यक्त केले.

जैन धर्माच्या इतिहासाची ओळख करुन देणारी लेणी येथे दिसून येते. लेण्यांच्या तीन बाजूस मोकळ््या जागेत मोठे मंडप आहेत. मंडपात पूजा करण्यासाठी जैन तीर्थंकरांची कोरलेली शिल्पे आहेत. मंडपात काळ््या पाषाणात एकाच लांबीचे दोन कोरलेले हत्ती आहेत. त्यांपैकी एक हत्ती अपूर्णावस्थेत दिसून येतो. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्याने वा अनुदान न मिळाल्याने ती अपूर्ण राहिल्याचे मत लेणी अभ्यासकार आणि जाणकार नोंदवतात. लेण्यांच्या उजव्या बाजूला तीर्थंकर तर डाव्या बाजूला पार्श्वनाथ यांचे भग्नावशेष दिसून येतात. जयंती नदीच्या पुरामुळे यांची हानी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.मंडपात १३ जैन तीर्थंकर, पार्श्वनाथ यांची बैठी प्रतिकृती, उभे तीर्थंकर लेण्यांच्या सौंदर्यात भर घालतात. त्याच बरोबर काताळात मोठ्या प्रमाणात कोरीव काम केल्याचे दिसते. किंबहूना राष्ट्रकुट काळातील व्यापार व्यवस्थेचे चित्रण काताळात रेखाटण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. शिवाय चौमुख, चौरी घेतलेल्या स्त्रीचे शिल्प, हार घेतलेल्या विद्याधराचे शिल्प, शिरविरहीत स्त्रीचे शिल्पे देखील आहेत. घोड्यावरील पुरुषांसह विषम संख्येतील स्त्री-पुरुष व्यापार करत असल्याचे तर्क जाणकार लावतात. लातूरमध्ये या लेण्याची साधर्म्य असणारी ‘खरोसा’ची लेणी आहे, असे कोठारी यांनी सांगितले.(क्रमश :)