शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या बाटलीत दमणची अवैध दारू

By admin | Updated: March 11, 2016 02:25 IST

डहाणूलगत असलेल्या गुजरातमधील दमण येथे स्वस्त मिळणाऱ्या दमण दारुचा फायदा पालघर जिल्ह्यामधील बनावट दारू विक्री करणाऱ्या टोळीने उचलला असून महाराष्ट्रातील नामवंत

शौकत शेख, डहाणू डहाणूलगत असलेल्या गुजरातमधील दमण येथे स्वस्त मिळणाऱ्या दमण दारुचा फायदा पालघर जिल्ह्यामधील बनावट दारू विक्री करणाऱ्या टोळीने उचलला असून महाराष्ट्रातील नामवंत कंपनीचे लेबल असणाऱ्या रिकाम्या बाटलीत दमणची त्याच कंपनीच्या नावाची बनावट दारू भरून ती एका कारखान्यात सीलबंद करून राज्यात महागड्या भावाने विकण्याचा गोरखधंदा सध्या तेजीत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बनावट मद्याची अदलाबदल करून सीलबंद करण्याचा कारखाना अद्यापही पोलीस व उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांना सापडत नसल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.पालघर जिल्ह्याच्या शहरी ग्रामीणसह खेडोपाड्यात राज्य उत्पादनशुल्क तसेच पोलीस प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कर्नाटक, तामीळनाडू तसेच मद्रासहून खास दारू बनविण्यासाठी आणलेल्या काळ्या गुळाला महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे बोगस बिल लावून गायी, म्हशींना खाण्याच्या खाद्याच्या नावावर त्याची खुलेआम विक्री सुरू आहे. त्यामुळे गाव, खेड्यापाड्यात गावठी दारूच्या हातभट््यांच्या व्यवसाय जोरात सुरू आहे. शिवाय डहाणूपासून केवळ १८ कि.मी. अंतरावर गुजरात राज्याची हद्द सुरू होत असल्याने दमण येथील अवैध दारु मोठ्या प्रमाणात बोर्डी-डहाणू, उधवा-तलासरी मार्गाने मुंबई-अहमदाबाद नॅशनल हायवेवरून महाराष्ट्रात आणली जाते. त्यामुळे दररोज शासनाचे लाखोंचे महसूल बुडत आहे. विशेष म्हणजे पोलीस प्रशासन केवळ देखावा करण्यासाठी महिन्यातून एक दोन वेळा दमण दारु पकडून गुन्हा दाखल करीत असते. परंतु मोठमोठ्या वाहनातून रोज दमणची दारू पास करण्यासाठी पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाना मोठा हप्ता दिला जात असल्याची चर्चा आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यात तिची विक्री होते. शासनाचा महसूल बुडवून दमण बनावटीची दारू खरेदी करून अवैधरित्या महाराष्ट्रात पुरवठा करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी डहाणू येथे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागचे लहानसे कार्यालय आहे.