शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

बेकायदा अतिक्रमणे पुन्हा उभी राहिली

By admin | Updated: November 2, 2016 03:36 IST

उल्हासनगरच्या राणा डम्पिंग ग्राऊंडशेजारची अतिक्रमणे-झोपड्या पाडण्याचा पालिकेने मोठा गाजावाजा केला.

उल्हासनगर : उल्हासनगरच्या राणा डम्पिंग ग्राऊंडशेजारची अतिक्रमणे-झोपड्या पाडण्याचा पालिकेने मोठा गाजावाजा केला. कारावईचे फोटो सोशल मीडियावर टाकले. पण ती बांधकामे दिवाळीच्या सुटीत पुन्हा उभी राहिल्याने प्रभाग अधिकारी, अतिक्रमणविरोधी पथक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांच्यावर आयुक्त नेमकी कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डम्पिंग ग्राऊंडशेजारी झोपडपट्टी उभी राहिली. खुल्या जागेवर अतिक्रमण होऊन २०० फुट लांबीचे अनेक व्यापारी गाळे बांधण्यात आले होते. यातील बहुतांश व्गाळ््यांना मालमत्ता कर आकारला जात नव्हता. ते उघडकीस आल्यावर प्रभाग अधिकारी नंदलाल समतानी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करून झोपड्या, गाळे तोडण्यात आले होते. कारवाईची शहरवासीयांना माहिती व्हावी, म्हणून तिचे फोटो व्हॉटसअ‍ॅपवर टाकण्यात आले होते. नेमके दिवाळीच्या सुटीत हे सारे पुन्हा उभे राहिल्याने त्याकडे दुर्लक्ष करणारे प्रभाग अधिकारी नंदलाल समतानी, बिट अभियंता, मुकादम, स्थानिक नगरसेवक, इतर भूमाफिया वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अंबरनाथ-कल्याण रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली वालधुनी नदीकिनारी बेकादया बांधकामे उभी राहिली. ज्यांना रस्ता रूंदीकरणाचा फटका बसलेला नाही, अशा व्यापाऱ्यांनीही विनापरवाना बहुमजली बांधकामे उभी केली आाहेत. तेथील प्रभाग अधिकारी अजित गोवारी, भगवान कुमावत यांच्यासह नगरसेवक, भूमाफिया यांच्या संगनमताने अवैध बांधकामे फोफावल्याचा आरोप सुरू आहे. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सुरूवातीला कारवाईचे आदेश दिले होते. मात्र दोन दिवसांतच ही कारवाई थांबली असून अवैध बांधकामे जैसे थे उभी राहिली आहेत. (प्रतिनिधी)>अवैध गाळ््यांत व्यवसायकॅम्प नंबर दोनच्या महादेव अणि अग्रवाल कम्पाऊंडच्या भूखंडावर अतिक्रमण आहे. पोलीस संरक्षणात पालिकेने तेथे अनेकदा कारवाई केली. मात्र मोठी आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याने तोडलेले बांधकाम पुन्हा उभे राहते. इतरही मोकळ््या जागांवर अनेक व्यापारी गाळे बांधले जात आहेत. तेथे अवैधरित्या अनेक व्यवसाय चालतात. भाजपाचा एक नगरसेवक यात गुंतल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा आहे.>९५ टक्के बांधकामे जैसे थेमोठा गाजावाजा करून, पोलीस संरक्षण घेत पालिका अवैध बांधकामांवर कारवाई करते. पोलिस संरक्षणावर कोट्यवधींचा खर्च होतो. पालिकेचे कामगार गुंतून पडतात. मात्र अशा तोडलेल्या बांधकामांचे सर्वेक्षण केले असता ९५ टक्के बांधकामे पालिकेच्या नाकावर टिच्चून पुन्हा उभी राहिली आहेत. अवैध बांधकामांत आडून संरक्षण देण्याच्या नावाखाली कोट्यवधींची उलाढाल होत असून वरपासून खालपर्यंत प्रत्येकाला चिरिमिरी मिळत असल्याने कारवाई धसास लावली जात नाही. नव्याने पालिकेची सूत्रे घेतलेले आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या आदेशानुसार पाडलेली बांधकामेही पुन्हा उभी राहिली आहेत.