शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

अवैध ५४ बांधकामे भुईसपाट

By admin | Updated: March 7, 2017 02:55 IST

५४ घरे, दुकाने आज पालघर तहसीलदार महेश सागर ह्यांच्या देखरेखीखाली जमीनदोस्त करण्यात आली.

हितेन नाईक,पालघर- जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला उभारण्यात आलेली ५४ घरे, दुकाने आज पालघर तहसीलदार महेश सागर ह्यांच्या देखरेखीखाली जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी अचानक कारवाईने आपली तुटणारे घरे पाहून सर्वत्र एकच आक्रोश सुरु होता. यावेळी कारवाईच्या आड येणाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्यात आली.नगर परिषद हद्दीतील व जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यालगत सर्व्हे न.४८/१/१/१ पैकी २३.०० क्षेत्रावर एका माजी नगरसेवकांने अतिक्रमण करून व त्या जागा गरीब, रोजंदारी कामगार यांची फसवणूक करून २० हजार ते दीड लाख रु पयांच्या मोबदल्यात विक्र ी केल्या होत्या.मागील २० ते २५ वर्षांपासून हे लोक त्या जागेवर रहात असून महावितरणने वीजपुरवठा केला होता. तर नगर परिषदेने घरपट्ट्ी लावून सार्वजनिक शौचालयेही बांधून दिली होती. निवडणुकीत येथील मतदारांची एक गठ्ठा मते नगरसेवकांना मिळत असल्याने त्यांनीही या अतिक्रमणाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले होते. त्यामुळे ती बांडगुळा सारखी दिवसेंदिवस वाढत होती. शेजारी आदिवासी मुला-मुलींचे वसतीगृह असून या झोपडीतील काही टवाळखोर तरु णांचा त्रास मुलींना होत असल्याच्या तक्र ारी होत्या.परंतु त्याकडेही दुर्लक्ष केले जात होते.रस्त्या लगत असणारी ही अतिक्र मणे शासकीय जागेत आणि जिल्हाधिकारी कार्यालया कडे जाणाऱ्या रस्त्याआड येत असल्याने तहसीलदारांनी विद्युत वितरण आणि मंडळ अधिकाऱ्या मार्फत काल (रविवारी)५४ अतिक्रमणधारकां विरोधात नोटीसी बजावल्या होत्या.आज सकाळी ९.३० वाजता तहसीलदार सागर, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, पोलीस निरीक्षक संजय हजारे, मंडळ अधिकारी राजेद्र पाटील, तलाठी विजू पाटील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी कारवाई दरम्यान उपस्थित होते. जेसीबी पथकाने आपली घरे उद्धवस्थ करायला सुरुवात केल्यावर परिसरातील वातावरण भावूक बनले होते. काहींनी अयशस्वि विरोधही केला. एका नगर सेवकाकडून मी २० वर्षांपूर्वी हि जागा विकत घेतली होती. माझ्या मुलाचे नुकतेच १२ टाक्याचे आॅपरेशन झाले असून मी हृदयविकाराची रु ग्ण असल्याचे विश्वकर्मा ह्या महिलेने सांगितले. आमची घरे जर बेकायदेशीर होती तर आम्हाला पाणी, वीज, शौचालये इ. सोयीसुविधा का पुरविण्यात आल्या? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.आता ह्या तोडक कारवायाचे सत्र पुढेपुढे सरकणार असून पालघर, माहीम, बोईसर ई. भागातील शासकीय जमिनीवरील अतिक्र मणावर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.>तहसीलदार व पोलिसांशी हुज्जतसकाळी अचानक कारवाईला सुरु वात झाल्यानंतर समोर जेसीबी आणि पोलीस बंदोबस्त पाहून आपल्या घरातील महत्वपूर्ण वस्तू वाचिवण्यासाठी एकाच धावपळ सुरू झाली. जेसीबीच्या पहिल्या फाटकाऱ्यानेच उध्वस्त होत असलेले आपले संसार वाचविण्यासाठी काही लोकांनी सरळ तहसीलदार, पोलिसांशी हुज्जती घालून स्वत:ला जेसीबी खाली झोकून देण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळी वातावरण चांगलेच तापले होते.