मुंबई : आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये केमिकल इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याने शनिवारी सायंकाळी विष पिऊन आत्महत्या केली. जितेश शर्मा असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो केमिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने आपण आयआयटीमध्ये येऊन चूक केल्याचे लिहिले आहे.गतवर्षी अनिकेत अंभोरे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. या प्रकाराला काही महिने उलटत नाहीत तोच शनिवारी जितेश शर्मा याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सायंकाळी रितेशचे मित्र बाहेर गेल्यानंतर त्याने जाऊन विष प्राशन केले. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
आयआयटीच्या विद्यार्थ्याची विष पिऊन आत्महत्या
By admin | Updated: May 4, 2015 02:35 IST