शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

‘आयआयटी मुंबई’ला सर्वाधिक पसंती!

By admin | Updated: July 10, 2015 03:32 IST

आयआयटीच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील सर्वोत्तम हजार विद्यार्थ्यांमधील २७३ विद्यार्थ्यांनी देशातील १८ आयआयटीमधून मुंबई आयआयटीला पसंती दर्शवली आहे

मुंबई : आयआयटीच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील सर्वोत्तम हजार विद्यार्थ्यांमधील २७३ विद्यार्थ्यांनी देशातील १८ आयआयटीमधून मुंबई आयआयटीला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे देशातील दिल्ली आणि मद्रास या नामांकित आयआयटीला मागे टाकत मुंबई आयआयटीच सरस असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.मुंबईनंतर दिल्ली आयआयटीला सर्वोत्तम हजारांमधील १९४ विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. देशातील १८ आयआयटींपैकी सर्वाधिक कोर्स आणि जागा खरगपूर आयआयटीमध्ये आहेत. मात्र या यादीत खरगपूर आयआयटी पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या हजारांमधील केवळ १०७ विद्यार्थ्यांनी खरगपूरला पसंती दिली आहे. यंदा २५ हजार विद्यार्थ्यांनी आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यात आयआयटी खरगपूर आणि मद्रासला सर्वाधिक अर्ज मिळाले आहेत. खरगपूरमध्ये एका जागेसाठी सरासरी १८६, तर मद्रासमध्ये १८३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली आयआयटीच्या एका जागेसाठी सरासरी १६४ व मुंबई आयआयटीला १६१ अर्ज आले आहेत.आयआयटीमधील कॉम्प्युटर सायन्स आणि अभियांत्रिकी शाखेसाठी सर्वाधिक अर्ज करण्यात आले आहेत. या शाखेच्या देशातील एकूण ९९० जागांपैकी प्रत्येक जागेसाठी सरासरी २०९ विद्यार्थ्यांप्रमाणे एकूण २ लाख ७ हजार ३२० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजेच १४ हजार ४९८ अर्ज आयआयटी मुंबईमध्ये करण्यात आले आहेत. इलेक्ट्रीकल आणि मॅकेनिकल या दोन्ही इंजिनीअरिंगच्या शाखांसाठी विद्यार्थ्यांनी मुंबईलाच पसंती दिल्याचे आकडेवारीवरून दिसते. इलेक्ट्रीकलच्या देशातील १,१७२ जागांपैकी प्रत्येक जागेसाठी सरासरी १८२ प्रमाणे १ लाख ९७ हजार ३२६ अर्ज आले आहेत. त्यात एकट्या मुंबई आयआयटीसाठी केलेल्या अर्जांची संख्या १४ हजार ३०५ इतकी आहे. मॅकेनिकल इंजिनीअरिंगच्या शाखेसाठी देशातील १७६ जागांसाठी एकूण २ लाख ६ हजार ७१४ अर्ज प्राप्त झाले. त्यात सर्वाधिक म्हणजे १४ हजार ११३ अर्ज हे मुंबई आयआयटीलाच आले आहेत. मुंबई आयआयटीमध्ये सरासरी एका जागेसाठी १७६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.