शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

आंबेडकर स्मारकाच्या वास्तवाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: March 4, 2017 02:35 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्यावरून आयुक्त व लोकप्रतिनिधींमध्ये वाद सुरू आहे

नामदेव मोरे,नवी मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्यावरून आयुक्त व लोकप्रतिनिधींमध्ये वाद सुरू आहे. या भांडणामध्ये स्मारकाच्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. वास्तविक इमारत हा स्मारकाचा पहिला टप्पा असून तो पूर्ण होण्यास सहा वर्षांचा कालावधी लागला आहे. स्मारकामधील कलादालन व वस्तुसंग्रहालयाचे आराखडेही अद्याप तयार झालेले नसून या महत्त्वाच्या कामाकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने आराखडे तयार करण्याचे काम हाती घेतले असून स्मारक पूर्ण होईपर्यंत किमान दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्यास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विरोध केल्याने त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू झाले आहे. रखडलेल्या स्मारकाच्या कामास पूर्णपणे मुंढे जबाबदार नसून त्यांचा संबंध फक्त डोमला मार्बल लावण्यापुरताच आहे. वास्तविक स्मारकाचे काम सुरू झाल्यापासूनच्या घडामोडींवर दृष्टिक्षेप टाकल्यास हे काम रखडण्यास यापूर्वीचे आयुक्त, सत्ताधारी राजकीय पक्ष, विरोधी पक्ष व सर्वच जबाबदार असल्याचे समोर येवू लागले आहे. ६ एप्रिल २०११ ला स्मारक उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. दोन वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली होती. काम संपविण्याची मुदत एप्रिल २०१३ निश्चित केली होती. पण स्मारकाच्या रचनेमध्ये वारंवार बदल करण्यात आला व इतर कारणांनी काम रखडू लागले. स्मारक पूर्ण करण्याची मुदत संपल्यानंतरही प्राथमिक कामेही झालेली नव्हती. २०१३ मध्ये काम पूर्ण झाले नसल्याने ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देण्यास सुरवात झाली. शेवटच्या मुदतवाढीचा कालावधी २८ फेब्रुवारी २०१७ ला संपला. ठेकेदाराला दिलेली शेवटची मुदत संपली तरी अद्याप बांधकाम पूर्ण झालेले नाही. आंबेडकर स्मारक म्हणजे फक्त सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या इमारतीचे काम नाही. सद्यस्थितीमध्ये डोमला मार्बल लावले किंवा मार्बल न लावताच काम पूर्ण झाल्याची घोषणा केली तरी प्रत्यक्षात उद्घाटन करणे किंवा स्मारक जनतेसाठी खुले करणे शक्य होणार नाही. वास्तविक स्मारकामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट वास्तुसंग्रहालय व कलादालन ही आहे. परंतु सहा वर्षांत अद्याप वास्तुसंग्रहालय कसे असावे त्यामध्ये नक्की कशाचा समावेश असावा याविषयी आराखडा तयार झालेला नाही. येथे कलादालन असून त्यामध्ये कशाचा समावेश असणार याविषयी स्पष्टपणे काहीही निर्णय घेतलेला नाही. प्रशासनाने आराखडे तयार करण्यास सुरवात केली आहे. ते पूर्ण झाल्यानंतर तो प्रस्ताव सर्वसाधारण सभेत प्रशासकीय मंजुरीसाठी येणार व त्यानंतर निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाणार असून ही कामे पूर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. >डोमवरील मार्बल बनला प्रतिष्ठेचा मुद्दाडॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या डोमला मार्बल लावण्याचा मुद्दा लोकप्रतिनिधी व आयुक्त यांनी प्रतिष्ठेचा बनविला आहे. डोमला मार्बल बसविणे योग्य होणार नसल्याच्या मुद्द्यावर तुकाराम मुंढे ठाम आहेत. लोकप्रतिनिधींच्या व नागरिकांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधींनीही हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला आहे. आयुक्त मनमानी करत असून हेकेखोरपणा सोडण्यास तयार नसल्याचा आरोप केला जात असून भांडणाचा फटका स्मारकाच्या कामावर होवू लागला आहे. >मुंढे येण्यापूर्वीच झाले पाहिजे होते कामडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्यास आयुक्तांनी केलेल्या विरोधामुळे स्मारकाचे काम रखडल्याचे भासविले जात आहे. पण प्रत्यक्षात एप्रिल २०११ मध्ये हे काम सुरू झाले आहे. काम संपविण्याची मुदत एप्रिल २०१३ होती. या वेळेमध्ये बांधकाम पूर्ण झाले असते तर वर्तमानस्थितीमध्ये सुरू असलेला वाद झालाच नसता. मुंढे येण्यापूर्वीच काम वेळेवर करण्यास लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अपयश आले असल्याचे वास्तवही लपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कामास झालेल्या विलंबाची कारणेमुख्य वास्तूच्या खालून जाणारी ६०० मीटर व्यासाची भूमिगत जलवाहिनी स्थलांतर करण्यात लागलेला वेळबांधकामासाठी लागणारा रेतीचा तुटवडावास्तूच्या मूळ डिझाइनमध्ये वेळोवेळी झालेले बदलव्हीजेटीआयकडून स्टेजिंग व शटरिंग डिझाइन मंजूर होण्यास झालेला विलंब५०० मीटर उंचीचा आरसीसी डोम बांधण्याचे काम अवघड असल्याने झालेला विलंब काम सुरू करण्याचा दिनांक६ एप्रिल २०११काम पूर्ण करण्याचा दिनांक५ एप्रिल २०१३मंजूर अंतिम मुदतवाढ२८ फेब्रुवारी २०१७भूखंडाचे क्षेत्रफळ५७५० चौरस मीटरबांधकामाचे क्षेत्रफळ२३१० चौरस मीटरबहुउद्देशीय इमारत८२५ चौरस मीटरमुख्य हॉल३०० चौरस मीटरकॉन्फरन्स रूम३७ चौरस मीटरसर्व्हिस एरिया१७२ चौरस मीटरव्हीआयपी रूम६४ मीटरपोडियम गार्डन८२५ चौरस मीटरखुले सभा मंडप८५६ चौरस मीटरडोम१३१५ चौरस मीटरप्रार्थना हॉल३२५ चौरस मीटरवस्तुसंग्रहालय२६४ चौरस मीटरकलादालन१३४ चौरस मीटरवाचनालय११४ चौरस मीटरवॉटर बॉडी२७५ चौरस मीटर