शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
8
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
9
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
10
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
11
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
12
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
13
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
14
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
15
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
16
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
17
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
18
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
19
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
20
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल

विद्युतविषयक समस्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 9, 2016 02:20 IST

जांभवली, थोरण, शिरदे, पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, काबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नानोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत

करंजगाव : नाणे मावळातील जांभवली, थोरण, शिरदे, पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, काबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नानोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत व इतर वाड्या-वस्त्यांवर विद्युत समस्या मोठ्या प्रमाणात असून, महावितरण त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी तक्रार नाणे मावळातील ग्रामस्थ करीत आहेत. काही ठिकाणी विद्युत खांब वाकलेले आहेत. तसेच काही गावात डीपी उघड्या आहेत. काही डीपींचे दरवाजे खाली पडले आहेत. काहींमधील फ्यूज खराब झाले असल्याने वारंवार विद्युतपुरवठा खंडित होतो. काही ठिकाणी थेट वायर जोडल्या आहेत. तेथे फ्यूज लावणे आवश्यक आहे. पावसाळ्यात तेथील स्थिती खूप धोकादायक बनू शकते. पावसाळ्यात विद्युतप्रवाह कमी-जास्त होत असल्यामुळे अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे खराब होतात. अनेकदा दिवसातून दहा-दहा वेळा पुरवठा खंडित होतो. वारंवार तक्रारी करूनही महावितरणचे कर्मचारी चौकशीसुद्धा करीत नाहीत. कर्मचारी अरेरावीची उतरे देतात. सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्यासाठी कामे करण्यास टाळाटाळ करतात. मीटर कनेक्शनसाठी विविध कारणे देत हेलपाटे मारायला लावतात. गावामध्ये आल्यावर गावात विद्युतविषयक समस्यांकडे ते लक्ष देत नाहीत.अनेक डीपी बॉक्सला दरवाजे नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी विद्युत खांब, विद्युतवाहक तारा, डीपीचे फ्यूज व्यवस्थित करावेत. गावांमधील विद्युत समस्यांची पाहणी शाखा अभियंता व कर्मचारी यांनी करून ग्रामीण भागातील विद्युतपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)नवीन मीटर बसवण्यासाठी ग्राहकांना सुरुवातीला आपली कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी कर्मचारी आपल्या मर्जीनुसार कागदपत्रे साहेबांच्या टेबलवर ठेवतात. गुरुवार भारनियमनाचा वार असल्याने आणि रविवारी असल्याने इतर दिवशी वीज मीटरच्या कोटेशनवर स्वाक्षरी केली जाते. स्वाक्षरी केल्यानंतर तेच कोटेशन बँकेत भरले जाते. कोटेशन भरल्यानंतर पुन्हा सहायक अभियंता यांच्याकडे दिले जाते. परंतु, मीटरसाठी महावितरण कार्यालयाकडे एक ते दोन महिने हेलपाटे मारावे लागतात. हेलपाटे मारूनही कर्मचारी दाद देत नाहीत.