शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

कंत्राटदाराकडून एसटी आगाराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 04:57 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील बस आगारांमधील स्वच्छतेसाठी खासगी कंत्राटदाराला काम दिलेले आहे.

महेश चेमटे मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील बस आगारांमधील स्वच्छतेसाठी खासगी कंत्राटदाराला काम दिलेले आहे. तीन वर्षांसाठी ४४६ कोटी रुपयांचा करार महामंडळ आणि खासगी कंत्राटदार यांच्यात झाला. मात्र, मुंबईतील कुर्ला नेहरुनगर, परळ येथील आगारांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. खासगी कंत्राटदाराने प्रत्येक आगार आणि स्थानकावर १० स्वच्छता कर्मचारी नेमणे अपेक्षित होते. मात्र, कुर्ला नेहरुनगर आणि परळ आगारात फक्त प्रत्येकी ४ स्वच्छता कर्मचारी आहेत. यामुळे खासगी कंत्राटदाराकडून एसटी आगाराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.मुंबईतील परळ आणि कुर्ला आगाराचा विस्तृत परिसर पाहता, येथे १५-१६ स्वच्छता कर्मचाºयांची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात ४ स्वच्छता कर्मचाºयांची नियुक्ती केलेली आहे. सकाळी ४ स्वच्छता कामगार आणि सायंकाळी २ स्वच्छता कामगार आगारात स्वच्छतेसाठी येतात, पण रोजच्या रोज सर्वांची हजेरी असतेच असे नाही. त्यामुळे अनेकदा एका किंवा दोघांवरच स्वच्छतेची जबाबदारी पडते. कुर्ला आगारातील बस वाहनतळ, बस स्थानक, कार्यशाळा, वाहक-चालक विश्रांतीगृह, दत्त मंदिर परिसर, कार्यशाळा या भागात स्वच्छता राखणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात सर्व ठिकाणी कचरा पडलेला असतो. खासगी कंत्राटदारांचे केवळ ४ कर्मचारी येतात. तेदेखील नीट काम करत नाहीत. विशेष म्हणजे, खासगी कंत्राटदाराला आठवड्याभरात ‘बस वॉशिंग’ ठिकाणाच्या स्वच्छतेची जबाबदारीदेखील देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कराराआधी राज्यभरात एसटी आगार-स्थानकांतील स्वच्छतेची जबाबदारी महामंडळाच्या १ हजार ८०० कर्मचाºयांवर होती. या कर्मचाºयांच्या वेतनापोटी ५० कोटी रुपयांचा खर्च यायचा. मात्र, त्यांच्या कामात गुणवत्तेचा अभाव होता, असे महामंडळाचे म्हणणे आहे. तरीही आर्थिक तोटा असूनही महामंडळाने खासगी कंत्राटदारासोबत ४४७ कोटींचा करार केला. मात्र, एसटी आगार-स्थानकांतील अस्वच्छता ‘जैसे थे’ असल्याचे समोर आले आहे.मुंबईसह राज्यभरातील बहुतांशी ठिकाणच्या एसटी आगार-स्थानके आणि परिसरात हीच अवस्था आहे. कराड, सांगलीसह दक्षिण महाराष्ट्रातून एसटी मुख्यालयात याबाबत तक्रार केल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. परिणामी, खासगी कंत्राटदारावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करूनही, एसटी परिसरात घाणीचे साम्राज्य आहे.भरती करू नये : एसटी महामंडळ आणि खासगी कंत्राटदार यांच्यात ‘एकात्मिक सुविधा व्यवस्थापन सेवा’ हा ठराव ५ जुलै २०१७ रोजी मंजूर करण्यात आला. या वेळी करारात, ‘सध्या महामंडळातील १,८०० सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्याबाबत संचालक मंडळाने निर्णय घ्यावा. भविष्यात एसटी महामंडळाने या पदांची भरती करू नये,’ असेदेखील नमूद केले आहे.>३ वर्षांसाठी ४४७ कोटीवर्ष कंत्राटदाराला देण्यात येणारी रक्कमपहिले वर्ष १३५,०४,४७,६९६दुसरे वर्ष १४८,५४,९२,४६५तिसरे वर्ष १६३,४०,४१,७१२एकूण रक्कम ४४६,९९,८१,८७३