शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

उत्कृष्ट आमदार व्हायचे तर विधानसभेत उपस्थित राहायला हवे - राज्यपाल रमेश बैस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 09:23 IST

पुण्याच्या एमआयटी शिक्षण संस्थेने बीकेसी येथील जीओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित केलेल्या तीनदिवसीय राष्ट्रीय आमदार परिषदेच्या समारोप शनिवारी झाला.

मुंबई : पूर्वी आमदार विधानसभेत बोलण्यासाठी अभ्यास करून यायचे. मात्र, आता इंटरनेट, गुगलसारखे माध्यम असूनही आमदार तयारी न करताच विधानसभेत येतात. विशेष म्हणजे, ते पूर्णवेळ विधानसभेत बसत नाहीत. एखादे विधेयक मंजूर करायचे झाले तरी व्हीप जारी करावा लागतो. तेव्हा उत्कृष्ट आमदार व्हायचे असेल तर अन्य आमदारांच्याही चर्चेला उपस्थित राहणे, जास्तीत जास्त वेळ विधानसभेत बसणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

पुण्याच्या एमआयटी शिक्षण संस्थेने बीकेसी येथील जीओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित केलेल्या तीनदिवसीय राष्ट्रीय आमदार परिषदेच्या समारोप शनिवारी झाला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. ते म्हणाले की, बऱ्याचदा अनेक महत्त्वाची विधेयके आणि अर्थसंकल्प कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर केला जातो. या विधेयकांचा परिणाम नागरिकांच्या जीवनावर पडणार असतो. त्यामुळे अशा विधेयकांच्या मंजुरीवेळी आमदारांनी चर्चेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. जे नवीन आमदार निवडून येतात त्यांच्यासाठी तीन महिन्यांचे प्रशिक्षण आयोजित करायला हवे. यासाठी एमआयटीने पुढाकार घ्यावा. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल एमआयटीचे प्रमुख विश्वनाथ कराड आणि राहुल कराड यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. 

आमदारांनी देशहिताला प्राधान्य द्यावे - मुख्यमंत्री देशात विविध पक्ष कार्यरत आहे. प्रत्येक पक्षाचे आमदार विविध राज्यांतील विधानसभांमध्ये आहेत. आपण वेगवेगळ्या राज्यांतून किंवा पक्षांचे आमदार असला तरी निवडणुकीच्या राजकारणापेक्षा देशाचे हित, सार्वभौमत्वाला प्रत्येकाने प्राधान्य द्यायला हवे. त्यामुळेच लोकशाही सक्षम होऊन भारत संपूर्ण विकसित राष्ट्र होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पुढील वर्षी गोव्यात होणाऱ्या संमेलनासाठीही शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

आपण प्रतिस्पर्धी, शत्रू नव्हे - व्यंकय्या नायडूआपण लक्षात ठेवले पाहिजे की, आपण प्रतिस्पर्धी आहोत, शत्रू नाही. आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. एखाद्या चुकीच्या गोष्टीसाठी प्रभावीपणे प्रतिकारही केला पाहिजे. पण, त्याचबरोबर आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी सन्मानाने वागायला हवे, असा सल्ला माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आमदारांना दिला.

टॅग्स :Ramesh Baisरमेश बैस