शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा विचार केला तर भूक कशी शांत होईल?; हातावर पोट असणाऱ्यांना हिंडावेच लागते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 11:01 IST

एप्रिलमध्ये मुंबईतील उन्हाने ३७ अंशांचा पारा गाठला होता. या उकाड्याने सर्वसामान्य हैराण झाले

मुंबई - सूर्य दिवसेंदिवस आग ओकत असून उकाड्याने शरीराची काहिली होत असतानाच हातावर पोट असलेले अनेक जण तळपत्या उन्हात  हिंडत आपल्याकडील वस्तू विकताना दिसतात. वस्तू विकल्या नाहीत तर पैसे मिळणार नाहीत आणि पैसे मिळाले नाहीत तर पोटाची खळगी भरणार नाही अशी स्थिती असल्यामुळे उन्हात पायपीट करण्याशिवाय अनेकांकडे पर्याय नाही. उन्हाचे चटके घेतल्याशिवाय पोटाची खळगी भरत नाही असे अनेकांनी सांगितले.

३७ अंश पारा गाठला एप्रिलमध्ये मुंबईतील उन्हाने ३७ अंशांचा पारा गाठला होता. या उकाड्याने सर्वसामान्य हैराण झाले असतानाच रस्त्यावर राहणारे, नाका कामगार पैसे कमाविण्यासाठी रस्त्यावर फिरतात. १०० ते २०० रुपये कमविण्यासाठी मुंबईतील ट्रॅफिक सिग्नल, टोल नाके, चौकात विविध वस्तू विकतात. वस्तू विकणाऱ्यांमध्ये वृद्ध माणसे, महिला यांचा समावेश असल्याने त्यांना उकाड्याचा भयंकर त्रास सहन करावा लागतो.

पदरात लहान मुले आणि म्हातारी माणसेरस्त्यावर तसेच ट्रॅफिक सिग्नलवर गुलाबाची फुले, खेळणी विकणाऱ्या महिलांच्या पदरात लहान मुले असल्याने त्यांना उन्हात काबाडकष्ट करून वस्तू विकाव्याच लागतात तसेच याच सिग्नलवर, टोल नाक्यांवर चणे, शेंगदाणे विकणाऱ्या पुरुषांची संख्याही कमी नाही.  या कष्टकऱ्यांच्या घरात म्हातारे आईवडील असल्याचे एका चणे विक्रेत्याने सांगितले.

१५० ते २०० रुपये कमाईटोल नाका, ट्रॅफिक सिग्नलवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्टकरी महिला, पुरुषांकडून लहान मुलांची खेळणी, फुले, हार, चणे, शेंगदाणे विकले जातात. तेव्हा कुठे १५० ते २०० रुपये कमाई होते. कधी कधी तर ७० ते ८० रुपयांवरच समाधान मानावे लागते, असे एका फूल विक्रेत्या महिलेने सांगितले.

महागाई वाढतेय दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने जगणेही मुश्कील झाले आहे. रोजच्या कमाईतून महागाईला तोंड देणे कठीण जात आहे. घरात खाणारी माणसे सहा आणि कमावते हात दोन असल्याने वस्तू विक्रीतून पुरेसे पैसे साठत नसल्याची खंत फुले विक्रेत्या महिलेने व्यक्त केली.