शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

"तोच विनोद पुन्हा पुन्हा केला तर..."; राहुल गांधींच्या आरोपावर सीएम देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:16 IST

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

Devendra Fadnavis ( Marathi News ) : लोकसभेचे विरोधी पक्षेनेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवरुन निवडणूक आयोग आणि भाजपावर गंभीर आरोप केले.  काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत या तीन नेत्यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. "महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काहीतरी गडबड झाली असल्यानेच आम्ही विचारलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाकडून उत्तर दिलं जात नाही," असा आरोप राहुल गांधी यांनी केला, या आरोपाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन एका वाक्यात प्रत्युत्तर दिले आहे. 

सखोल अभ्यास केला, महाराष्ट्राच्या निवडणुकीत गडबड झालीय; राहुल गांधी-सुळे-राऊतांचा आरोप

 खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात ट्विट करुन प्रत्युत्तर दिले. 'तोच तोच विनोद पुन्हा पुन्हा सांगितला तर तेव्हा आपण हसत नाही, असं ट्विटमध्ये करत गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी-सुळे-राऊतांचा आरोप

निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, "महाराष्ट्रात पाच वर्षांत जितक्या नव्या मतदारांची नोंद झाली नाही, त्यापेक्षा अधिक मतदार शेवटच्या पाच महिन्यांत नोंदवले गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ३९ लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. म्हणजे हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक मतदार या कालावधीत नोंदवण्यात आले. हे मतदार नेमके आले कुठून?" असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला आहे.

"सरकारच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील प्रौढ लोकसंख्या ९. ५४ कोटी इतकी आहे.  मात्र निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे की महाराष्ट्रात ९.७० कोटी इतके मतदार आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील एकूण प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक असल्याचा दावा आयोगाने केला आहे.  विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर तब्बल १२ टक्के मतदान वाढल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. आम्ही मागील काही दिवसांत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचा सविस्तर अभ्यास केला आहे. या निवडणुकीत काहीतरी गोंधळ नक्कीच झाला आहे. महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये अनियमितता आढळली आहे," असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाElectionनिवडणूक 2024