शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आबांनी ऐकले असते तर...

By admin | Updated: February 19, 2015 23:49 IST

अजित पवार : पवार कुटुंबीय आबांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी

सावळज : ‘कॉमन मॅन’चे प्रतिनिधित्व करणारा निर्मळ मनाचा नेता गेला. मी आबांना जे सांगितले होते, ते आबांनी त्याचवेळी ऐकले असते, तर ही वेळच आली नसती, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी आदरांजली वाहिली. आता पवार कुटुंबीय व स्वत: शरद पवारसाहेब आबांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. बारामती व वाळव्याप्रमाणे तासगाव-कवठेमहांकाळकडेही लक्ष देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम अंजनी (ता. तासगाव) येथे झाला. यावेळी पवार बोलत होते.गुरुवारी सकाळी अंजनी-वडगाव रस्त्यावर पाटील यांच्या अंत्यविधीच्या ठिकाणी अनेक नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी गर्दी केली होती. दाटलेल्या अंत:करणाने हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या रक्षाविसर्जनाला उपस्थिती लावली होती. पाटील यांचे पुत्र रोहित यांच्या हस्ते विधिवत रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. पाटील यांचे बंधू राजाराम, सुरेश, मातोश्री भगीरथी, पत्नी सुमन, कन्या स्मिता व प्रियांका यांनी अस्थींचे दर्शन घेतले. त्यानंतर अनेक अस्थिकलश तयार करून रक्षाविसर्जनाला आलेल्या सर्व लोकांपर्यंत नेण्यात येऊन अस्थींचे दर्शन देण्यात आले.त्यानंतर अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, वसंत डावखरे, माजी मंत्री आ. जयंत पाटील, आ. पतंगराव कदम, खा. संजयकाका पाटील, आ. विलास लांडे, आ. अनिल बाबर, विलासराव शिंदे, पृथ्वीराज देशमुख, दिलीप पाटील, अविनाश पाटील, चंद्रकांत दळवी, बजरंग पाटील यांनी आर. आर. पाटील यांना आदरांजली वाहिली.अजित पवार म्हणाले की, गोरगरिबांबद्दल पोटतिडकीने बोलणारा, दीनदलितांना बरोबर घेऊन काम करणारा सहकारी गेला. बारामती व वाळव्याप्रमाणे तासगाव-कवठेमहांकाळकडेही लक्ष देऊ आणि आबांचे स्वप्न पूर्ण करू.यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आ. दीपकआबा साळुंखे, माजी आमदार मानसिंगराव नाईक, प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, गौतम पाटील, विजय सगरे, जीवनराव भोसले उपस्थित होते.अस्थींचे विसर्जन २४ लाआबांच्या इच्छेनुसार दहावा, तेराव्याचा विधी आजच करण्यात आला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना अस्थिकलश देण्यात आले. सांगली येथे मंगळवार (दि. २४)पर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, मंगळवारी अस्थींचे विसर्जन होणार आहे.