शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 00:11 IST

Latur News: विजय घाटगे यांनी मारहाणीनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अजित पवार यांना डिवचले आहे. आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर याचा हिशोब होईल, असा इशारा घाडगे यांनी दिला आहे.

राज्य सरकारमधील मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देत त्यांच्यावर पत्ते फेकले होते. यावेळी झालेल्या बाचाबाचीमधून अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजय घाडगे यांना मारहाण केली होती. त्यानंतर आता विजय घाटगे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अजित पवार यांना डिवचले आहे.  आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर याचा हिशोब होईल, असा इशारा घाडगे यांनी दिला आहे.

या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना विजय घाडगे म्हणाले की, ‘आम्ही सनदशीर मार्गाने राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडे  कृषिमंत्र्यांच्या विरोधात निवेदन दिले. विधानसभेच्या दालनात पत्ते खेळत असलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. मात्र, राष्ट्रवादीने आमच्यावर गुंड लावून दिले. त्यांच्याकडून आम्हाला मारहाण झाली.

ते पुढे म्हणाले की,  अजित दादा तुमच्या कार्यकर्त्यांनी आज आमच्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे. छावा म्हणजे शेतकऱ्याची पोरं आहेत. आमच्या निवेदनाला तुम्ही लाथा बुक्क्यांनी प्रतिसाद देणार असाल तर याचा हिशोब होईल, छावा संघटना आपल्या स्टाईलने प्रत्युत्तर देईल, त्याची राजकीय किंमत तुम्हाला चुकवावी लागेल, असा इशारा घाडगे यांनी अजित पवार गटाला दिला आहे.    

टॅग्स :laturलातूर