शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : पहिलवान तयार असेल तर मोदी-शहांना का आणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 06:53 IST

शरद पवार यांची टीका : राज्याची आर्थिक स्थिती बिघडल्याकडे वेधले लक्ष

मुंबई : पहिलवान तयार आहे. विरोधी कोणी नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात, तर मोदी-शहासह इतरांना प्रचाराला का आणता? असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत मुंबईतील पहिल्या सभेला सुरुवात केली. तर दुसरीकडे भाजप-सेनेमध्ये एकवाक्यता न राहिल्याने, महाराष्ट्राची स्थिती बिघडत असून, राज्याचे नुकसान होत असल्याची टीका पवार यांनी केली.

कांजूर दातार कॉलनी येथे विक्रोळी विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय पिसाळ यांच्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. ही निवडणूक महाष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. लोकसभेची निवडणूक झाली. त्याचे विषय वेगवेगळे आहेत. शेजारच्या राष्ट्राने अतिरेकी हल्ला केला, त्याला देशाने उत्तर दिले. त्या बळावर त्यांनी लोकसभा जिंकली, पण ही महाराष्ट्राची निवडणूक आहे. येथील वेगवेगळे विषय आहेत. राज्यात अतिवृष्टी झाली, कोरडा दुष्काळ झाला, तर १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्र वेगळा झाला, तेव्हा सर्व मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक वसाहती धोरण निश्चित केले. हजारो हातांना काम दिले, पण गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, पण ५० टक्के कारखाने बंद आहे. कृषी, औद्योगिक सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्र एकवर होता, पण आता ती स्थिती राहिलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

राज्यात सेना भाजपचे राज्य आहे, पण राज्य एका विचाराने चालवावे लागते, पण त्या दोघांमध्ये एकवाक्यता राहिलेली नाही. मुख्यमंत्री, सेनाप्रमुख वेगवेगळे विचार, भूमिका मांडतात. राज्य चालविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्यात एकवाक्यता नसेल, तर प्रशासनावर त्यांचे नियंत्रण राहत नाही. मी ५२ वर्षे काम केले आहे. प्रशासन यंत्रणेवर सरकारचं नियंत्रण नसेल, तर आपण अधोगतीकडे जातो. उद्धव ठाकरे उद्या माझ्यावर टीका करतीलच. त्यांना त्यांच्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा लाभला. म्हणून त्यांना मिळालेल्या जबाबदारीचे मूल्य नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या काळातअसे नव्हते. सध्या परिवर्तनाची गरज आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी एकत्र विचार केला, म्हणून आम्ही एकजुटीने राहून राज्य करू. आम्हाला निवडून द्या, असे पवार म्हणाले.गुन्हेगारीचा विचार करण्याची गरज!देशात गुन्हे वाढत आहे. हे केंद्र सरकारने सादर केलेल्या गुन्हे अहवालात हत्या, बलात्कारामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. याचे दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे, राजकर्त्यांचा प्रशासनावर नियंत्रण नाही, तर दुसरे तरुण पिढीचे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत. याचा सरकारने विचार करण्याची गरज आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार