शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

तर आपल्याला पाडगावकरांच्या आधी मोदींसाठी शोकसभा घ्यावी लागली असती - श्रीपाल सबनीस

By admin | Updated: January 1, 2016 16:21 IST

दहशतवाद्यांकडून धोका असतानाही शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदी पाकमध्ये गेले, त्यांना तेथे काही झाले असते तर आपल्याला पाडगावकरांच्या आधी त्यांना श्रद्धांजली वहावी लागली असती.

पुणे, दि. १ -  संघाची पार्श्‍वभूमी असलेले पंतप्रधान मोदी काबूलवरून अचानक पाकिस्तानात नवाझ शरीफ यांचा पुळका आला म्हणून गेले नव्हते, तर राष्ट्रहितासाठी त्यांनी तो निर्णय घेतला, मात्र याच मोदींची पंतप्रधानपदाआधीची गोध्रा हत्याकांड काळातील मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द कलंकित आहे. पण पंतप्रधानपदी आल्यानंतर मोदी गौतम बुद्ध, महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान सांगत जगातील दहशतवाद कमी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. अमेरिका-चीनशी मैत्री करीत आहेत. शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी मोदी तळहातावर शीर घेऊन पाकमध्ये गेले. दहशतवाद्यांकडून त्यांच्या जिवास धोका होता, त्यांना कोणाचीही गोळी लागू शकली असती. तसे असते एका दिवसात ते संपले असते आणि आपल्याला मंगेश पाडगावकरांच्या आधीच नरेंद्र मोदींसाठी शोकसभा घ्यावी लागली असती... असे खळबळजक विधान नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. 
आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वागताध्यक्ष मोहन देशमुख, पिंपरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, प्राचार्य नितीन घोरपडे, अमृता गुलाटी आदी या वेळी उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान समन्वय आणि संवादाबाबत त्यांनी पंतप्रधानांचे उदाहरण देताना त्यांनी त्यांच्या पाकिस्तानच्या दौ-याचा उल्लेख करत त्यांनी तेथील धोक्याची कल्पना दिली. जीवाला एवढा धोका असतानाही मोदी तेथे गेले. मोदी एवढे समर्पण करणारी व्यक्ती असून त्यांचा पक्ष, विचार बाजूला ठेवून आपल्याला सुसंवाद केला पाहिजे, असे सबनीस म्हणाले. 'संघर्षाच्या जागांचा अपवाद करून आता संवादाकडे वळले पाहिजे, त्याचाच भाग म्हणून गुलाम अलींसारख्या पाकिस्तानी कलाकारांना आपल्याकडे कार्यक्रम करू द्यायला हवे' असेही त्यांनी सांगितले.