शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आबांनी त्याचवेळी ऐकले असते तर...

By admin | Updated: February 20, 2015 01:20 IST

आबांनी त्याचवेळी ऐकले असते, तर ही वेळच आली नसती, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी त्यांना आदरांजली वाहिली.

सावळज (सांगली) : ‘कॉमन मॅन’चे प्रतिनिधित्व करणारा निर्मळ मनाचा नेता गेला. मी आबांना जे सांगितले होते, ते आबांनी त्याचवेळी ऐकले असते, तर ही वेळच आली नसती, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी त्यांना आदरांजली वाहिली. पवार कुटुंबीय व स्वत: शरद पवार आबांच्या कुटुंबियांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतील. बारामती व वाळव्याप्रमाणे तासगाव-कवठे महांकाळकडेही लक्ष देऊ, अशी ग्वाही त्यांनी अंजनी (ता. तासगाव) येथे झालेल्या पाटील यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रमात दिली. अंजनी-वडगाव रस्त्यावर पाटील यांच्या अंत्यविधीच्या ठिकाणी अनेक नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी गर्दी केली होती. दाटलेल्या अंत:करणाने हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या रक्षाविसर्जनाला उपस्थिती लावली. अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, वसंत डावखरे, माजी मंत्री आ. जयंत पाटील, आ. पतंगराव कदम, खा. संजय पाटील आदींनी पाटील यांना आदरांजली वाहिली. (प्रतिनिधी)च्सर्व जनता हेच आबांचे कुटुंब होते. आबा आयुष्यभर लढले. मरणालाही ते लढत-लढत सामोरे गेले. आता आपण रडायचे नाही, लढायचे. आबांची अपूर्ण कामे पूर्ण करूया, असे आवाहन आबांच्या कन्या स्मिता पाटील यांनी केले. आबांच्या इच्छेनुसार दहावा, तेराव्याचा विधी गुरुवारीच करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना अस्थिकलश देण्यात आले. हिरवेबाजारमध्ये व्यसनमुक्ती दिनआर. आर. पाटील यांचा स्मृतिदिन व्यसनमुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय हिवरेबाजारच्या श्रद्धांजली सभेत घेण्यात आला. पाटील गृहमंत्री असताना गावाला रुग्णवाहिका खरेदीसाठी २ लाखांचा निधी मिळाला होता. वास्तवत: रुग्णवाहिकेसाठी ७ लाखांचा निधी आवश्यक होता. मात्र, पाच लाख रुपये अन्य योजनेतून मिळू शकले नाहीत. त्यामुळे आबांच्या स्मृती कायमस्वरूपी जपल्या जाव्यात म्हणून त्यावेळी मिळालेले २ लाख आणि अन्य ५ लाख रुपये लोकवर्गणीतून उभारून वनौषधी उद्यान उभारण्यात येणार आहे.अस्थींचे चंद्रभागेत विसर्जनपंढरपूर : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या अस्थींचे गुरुवारी चंद्रभागेत विसर्जन करण्यात आले. अंजनी (जि. सांगली) येथून दुपारी साडेबाराच्या सुमारास अस्थी कलश फुलांनी सजविलेल्या टेम्पोमध्ये पंढरपुरात आणण्यात आला. सांगोला, खर्डी अशा अनेक ठिकाणी अस्थींचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास टाळ-मृदंगाच्या गजरात चंद्रभागेमध्ये आबांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.