शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत वार झाला नसता - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 1, 2016 09:37 IST

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत हे असे वार झाले नसते. कारण पाठीत वार करण्याची अवलाद शिवसेनेची नाही असे सांगत उद्धव ठाकरेंनी एकनाथ खडसेंना सहानुभूती दर्शवली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - : माझ्याविरोधात ठरवून कारस्थान केले गेले. पण मी तोंड उघडले तर देश हादरला असता, असे खळबळजनक विधान करणारे भाजपाचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पाठराखण केली आहे.एरवी एकनाथ खडसेंवर तुटून पडणा-या शिवसेनेने आजच्या अग्रलेखातून खडसेंना सहानुभूती दाखवत भाजप नेत्यांना टोले लगावले आहेत. 
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही भाजपावर टीकास्त्र सोडत 'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत हे असे वार झाले नसते. कारण पाठीत वार करण्याची अवलाद शिवसेनेची नाही' असे सांगत खडसेंना सहानुभूती दर्शवली आहे. 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून उद्धव यांनी भाजपावर टीका केली आहे. 
   
   आणखी वाचा :
(बोललो असतो तर भारत हादरला असता- एकनाथ खडसे)
(खडसेंची धमकी पक्षाला की नेत्यांना?)
  •  
 
  •  
 
 
'युती आपणच तोडल्याची शेखी खडसे एखाद्या शौर्यचक्राप्रमाणे मिरवीत होते. शिवसेनेशी युती तोडली म्हणून भाजपचा मुख्यमंत्री झाला, पण माझ्या वाट्याला हे काय आले? असा प्रश्‍न खडसे यांनी केला. खडसे यांची वेदना समजून घेतली पाहिजे, त्यांनीच शिवसेनेशी युती तोडण्यात पुढचे पाऊल टाकले. कारण त्यावेळी देशात मोदी यांची लाट होती व त्या लाटेत ओंडके व काटक्याही तरंगल्या. आम्हाला त्याची खंत नाही. पण युती तोडली नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, असे खडसे म्हणतात. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत हे असे वार कदाचित झाले नसते. कारण पाठीत वार करण्याची अवलाद शिवसेनेची नाही' असे उद्धव यांनी म्हटले आहे.  शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर आभाळ कोसळले असते काय? याचे चिंतन करण्यास खडसे आता मोकळे आहेत, असेही उद्धव यांनी नमूद केले आहे. तसेच खडसे यांच्यावर लागलेला ‘दाऊद’ संबंधाचा आरोप मान्य होण्यासारखा नाही. दाऊदशी संबंध जोडून खडसे यांच्या देशभक्तीवरच कलंक लावण्याचा प्रकार हा त्यांच्यावर अन्याय ठरतो व याबाबतीत त्यांचे ऐकून घेतले नाही हा त्याहून मोठा अन्याय ठरू शकतो, अशी सहानुभूती त्यांनी व्यक्त केली. तसेच  खडसे यांच्याशी राजकीय लढायला आम्ही समर्थ आहोत. पण एखाद्या विषयात नाहक बदनामी घडवून राजकीय पोळ्या भाजणारे आम्ही नव्हे, हे सत्य सांगण्याची हिंमत आमच्यात आहे व त्याबद्दल खडसे यांच्या पक्षातील कुणाचा आक्षेप असेल तर त्यांना बोंबलण्याचा आणि ‘सामना’ जाळण्याच्या धमक्या देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असा चिमटाही उद्धव यांनी भाजपा नेत्यांना काढला आहे.