मुंबई : औषधी उत्पादक कंपन्यांकडून सॅम्पल म्हणून मोफत देण्यात येणाऱ्या औषधांची विक्री केल्यास संबंधित कंपनीच्या एमआर (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) आणि डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले जातील, अशी घोषणा अन्न व औषधी प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली.पुण्यात अस्तित्वात नसलेल्या औषध दुकानांच्या नावे बनावट बिले तयार करून किडनीच्या आजारावरील औषध विक्री केल्याप्रकरणी एका कंपनीचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने रद्द केल्याची घटना घडली. त्यावर योगेश टिळेकर, जगदीश मुळीक आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बापट म्हणाले, की या प्रकरणी ६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून औषध विक्रेत्याचा परवाना रद्द केला आहे. डॉ. कर्वे यांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरील औषध उपलब्ध नव्हते. त्यावर डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनच्यामागे अमुक एमआरला भेटायला सांगितले होते.
सॅम्पल औषधांची विक्री केल्यास गुन्हा दाखल
By admin | Updated: March 31, 2015 02:53 IST