शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

खर्च न केल्यास पुस्तक निधी जाणार परत

By admin | Updated: July 20, 2016 03:27 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि नगर पालिकेच्या १ हजार ५६१ शाळांना पुस्तके प्राप्त होणार आहेत.

अलिबाग : सर्व शिक्षा अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि नगर पालिकेच्या १ हजार ५६१ शाळांना पुस्तके प्राप्त होणार आहेत. नावीण्यपूर्ण उमक्र माच्या माध्यमातून ४० लाख ५८ हजार ६०० रु पयांचा निधी उपलब्ध होणार आहे. १५ आॅगस्ट २०१६ पर्यंत रक्कम शाळा व्यवस्थापनाने खर्च न केल्यास सरकारकडे जमा होणार आहे. २०० पेक्षा कमी पुस्तके असणाऱ्या शाळांना या योजनेचा फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी ही योजना संजीवनी म्हणून प्रभावी काम करणार आहे.महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदेने यू डायसनुसार निवडलेल्या १ हजार ५६१ शाळांनी पुस्तकांसाठी मिळणारी रक्कम १५ आॅगस्टपर्यंत खर्च करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास तो निधी परत सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहे.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सरकारने ७ आॅक्टोबर २०१५ रोजी निर्णय घेतला आहे. त्यानुसार माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून १५ आॅक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पार्श्वमूमीवर प्रत्येक शाळेमध्ये डॉ. कलाम वाचन कट्टा उभारण्यात येणार आहे. गेल्या वर्षी या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला होता. १५ आॅक्टोबर रोजी राज्यातील २.२३ कोटी मुले किमान प्रत्येकी १0 पुस्तके असे एकूण २२.३0 कोटी पुस्तके वाचण्याचा हा संकल्प आहे.प्रत्येक शाळेत २00 पेक्षा जास्त पुस्तके अपेक्षित आहेत. वाचन प्रेरणा चळवळ रुजविणे व मुलांच्या वयानुरूप पुस्तकांची उपलब्धता करण्यासाठी माजी विद्यार्थी, पालक, व्यक्तिगत, समाजातून पुस्तक भेटीच्या कार्यक्र मातून पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. >पुस्तक खरेदीसाठी २ हजार ६०० रुपयेजिल्ह्यातील १ हजार ५६१ शाळांना पुस्तके खरेदीसाठी प्रत्येकी २ हजार ६०० रुपयांप्रमाणे एकूण ४० लाख ५८ हजार ६०० मिळणार आहे. ही रक्कम जि. प. शिक्षण विभागाकडून थेट शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. शाळांना पुस्तकांसाठी निधी उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागेल व वाचन संस्कृतीला चालना मिळेल.रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात १0४, पेण १५७, पनवेल १४९, उरण २४,कर्जत १८१, खालापूर १५६, रोहा १४९, सुधागड ८६, माणगाव १५८, महाड १५७,पोलादपूर ६१, श्रीवर्धन ४९, म्हसळा ३१, मुरु ड ५१, तळा ४८, अशा एकूण एक हजार ५६१ शाळांना वाचन कट्ट्यासाठी पुस्तके मिळणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.