शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

‘अच्छे दिन’ न आल्यास अराजक

By admin | Updated: July 24, 2015 02:25 IST

आता मोदीच देशाला वाचवतील, लोकांचं कल्याण करतील, अशी आशा जनतेला वाटत आहे. त्यामुळेच या आशेच्या जर चिंधड्या उडाल्या तर काय

मुंबई : आता मोदीच देशाला वाचवतील, लोकांचं कल्याण करतील, अशी आशा जनतेला वाटत आहे. त्यामुळेच या आशेच्या जर चिंधड्या उडाल्या तर काय परिस्थिती उद्भवेल हे सांगता येत नाही. बाळासाहेबांच्याच भाषेत सांगायचे तर फक्त अराजक आणि अराजकच माजेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलखतीत दिला आहे.युती मजबूत करण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न व्हायला पाहिजेत. शिवसेना ही सत्तेकरिता कधी युती करत नाही. निवडणुका असोत किंवा नसोत, चांगले दिवस असोत की नसोत एकदा मित्र म्हटले म्हणजे मित्र ही शिवसेनेची नीती आहे. शिवसेनाप्रमुखांनी ती आपल्याला शिकवली आहे, अशा शब्दांत भाजपाच्या स्वबळाच्या नाऱ्याचा ठाकरे यांनी समाचार घेतला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष इकडे येतात व युतीचे राजकारण पुरे करा असे सांगतात. पण तिथे काश्मीरमध्ये मात्र आझाद काश्मीरवाल्या किंबहुना पाकधार्जिण्या पक्षासोबत युती त्यांना चालते हे एक मोठे आश्चर्य असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली. गोंदियातील काँग्रेस व भाजपा युतीवरही त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. ठाकरे कधीच निराश होत नाहीत. केंद्रात व राज्यात अशा दोन्ही ठिकाणी शिवसेना सत्तेत सहभागी आहे. पण ही सरकारे शिवसेनेची नाहीत. पूर्वी एनडीएतील घटक पक्षांना विश्वासात घेऊन अटलजी सरकार चालवत होते. चंद्राबाबू, रामविलास पासवान असे नेते एनडीएत आले व गेले. ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशा प्रकारे जर सरकार चालवणार असाल तर तशा राजकारणात शिवसेना पडणार नाही, असेही उद्धव यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)