शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर तो मी ५० वेळा करीन!; विरोधकांच्या हक्कभंगावर मुख्यमंत्र्यांचा सभागृहात खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 06:24 IST

खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधातील हक्कभंगावर सुनावणी करताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सत्ताधारी पक्षाच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांना त्यांच्याविषयीच्या हक्कभंगावर खुलासा करण्यास परवानगी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विरोधकांनी हक्कभंगाची सूचना दिल्यानंतर आता हा हक्कभंग स्वीकारला जाणार का, या चर्चेलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात खुलासा करीत पूर्णविराम दिला. विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे किंवा विरोधी पक्षातील सदस्यांना देशद्रोही बोललेलो नाही, तर दाऊदशी संबंधित व्यक्तींसोबत संबंध ठेवणाऱ्या नवाब मलिक यांना देशद्रोही संबोधले, असा खुलासा करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी  देशद्रोह्यांविरोधात बोलणे गुन्हा असेल तर तो मी ५० वेळा करीन, मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे, अशा शब्दांत विरोधकांना चितपट केले.

खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधातील हक्कभंगावर सुनावणी करताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सत्ताधारी पक्षाच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांना त्यांच्याविषयीच्या हक्कभंगावर खुलासा करण्यास परवानगी दिली. त्यावेळी विरोधकांकडून हक्कभंगावर खुलासा हा समितीकडे होऊ शकतो सभागृहात नाही, असा आक्षेप नोंदवला. यावर उपसभापतींनी हा आपला अधिकार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांना बोलण्याची परवानगी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. त्यानंतर शिंदे यांनी आपले म्हणणे सभागृहात मांडले.

‘ते’ वक्तव्य मलिकांबाबतnमाझे देशद्रोह्यांबद्दलचे वक्तव्य अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्याविरोधातील नव्हते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्याबद्दल होते. nमलिक यांच्यावर एनआयए, ईडीकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचे कुख्यात गुंड व देशद्रोही दाऊद इब्राहिम, छोटा शकील, इकबाल मिर्ची, हसीना पारकर यांच्याशी संबंध होते. nदाऊदची बहीण हसीनासोबत त्यांनी जमीन आणि गाळे खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. nहसीनाचा ड्रायव्हर सरदार खान ज्याला बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झाली होती त्याच्याकडूनही मलिक यांनी जमीन घेतली. यामुळेच त्यांना अटक झाली असून, जामीन देखील झालेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

मलिकांविरोधातील आरोप सिद्ध नाहीत - विरोधकमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, अनिल परब, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला.  मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत, मलिकांसोबत स्वत: मुख्यमंत्री मंत्रिमंडळात होते, ही बाब विरोधकांनी निदर्शनास आणली.

हक्कभंग अजून स्वीकारला नाहीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर खुलासा केला आहे. त्यांच्याविषयीचा हक्कभंग मी स्वीकारलेला नाही. त्यामुळे तो हक्कभंग समितीसमोर पाठवायचा की नाही त्यावर मी निर्णय घेईन, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी देशद्रोह्यांसोबतचे चहापान टळले, असे म्हटले आहे पण त्यांनी देशद्रोह्यांना चहापानाला बोलावले होते का? समजा विरोधक जर चहापानाला आले असते तर त्यांना देशद्रोही म्हटले गेले होते, मग अशा लोकांसोबत मुख्यमंत्र्यांनी चहापान घेतले असते का?- उद्धव ठाकरे, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेvidhan sabhaविधानसभा