शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी कुरूप असेल तर द्यावा लागतो जास्त हुंडा, १२ वीच्या पुस्तकात संतापजनक विधान

By admin | Updated: February 3, 2017 09:41 IST

'जर मुलगी कुरूप असेल तर पालकांना जास्त हुंडा द्याव लागतो' असे संतापजनक विधान बारावीच्या पुस्तकातील धड्यात करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - 'जर मुलगी कुरूप असेल तर पालकांना जास्त हुंडा द्याव लागतो'  हे धक्कादायक आणि तितेकच संतापजनक विधान एखाद्या नेत्याने नव्हे तर महाराष्ट्र सरकारने प्रमाणित केलेल्या बारावीच्या पुस्तकातील आहे. १२वीच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकातील एक धड्यात हे विधान करण्यात आले असून यामुळे सर्व स्तरांतून टीका आणि चीड व्यक्त होत आहे.  देशातील प्रमुख सामाजिक समस्या’ असा धडा समाजशास्त्राच्या पुस्तकात असून त्या 'कुरूपता' हे हुंड्यामागचे एक प्रमुख कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ' मुलगी कुरुप किंवा दिव्यांग असेल तर तिच्या पालकांना जास्त हुंडा द्यावा लागतो' असे महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाने प्रमाणित केलेल्या या धड्यात म्हटले आहे. 
हुंडा का देतात किंवा घेतात? हे अनेक घटकांवर अवलंबून असते. ' जात, धर्म, सामाजिक प्रतिष्ठा यासारख्या अनेक कारणांपैकी मुलीची कुरुपता किंवा व्यंग हेही हुंड्याचे एक कारण असतं' असे त्यात म्हटले आहे. एवढेच नव्हे तर 'कुरुपतेमुळे मुलीचं लग्न जमवणं कठीण होतं. तिचं लग्न जमवण्यासाठी कुटुंबीय हतबलतेतून मुलाला हुंडा देतात. त्यातून हुंड्यासारख्या प्रथांना प्रोत्साहन मिळतं', असंही या पुस्तकात म्हटलं आहे. 
या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला असून अनेक स्वयंसेवी संघटनांनी या पुस्तकांवर टीका केली आहे.