शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

विदेशी तरुणीची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली तर जरा सावधान!

By admin | Updated: April 19, 2017 01:15 IST

तुम्हाला एखाद्या विदेशी तरुणीची ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ आली आहे का? जर असे असेल तर जरा जपून... सध्या विदेशी तरुणींच्या नावाने ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठवून अनेकांना लाखोंचा चुना लावणारी टोळी सक्रिय आहे

मुंबई : तुम्हाला एखाद्या विदेशी तरुणीची ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ आली आहे का? जर असे असेल तर जरा जपून... सध्या विदेशी तरुणींच्या नावाने ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठवून अनेकांना लाखोंचा चुना लावणारी टोळी सक्रिय आहे. भांडुप पोलिसांनी अशाच एका नायजेरीयन पती-पत्नीवर केलेल्या कारवाईनंतर ही ‘मोडस् आॅपरेंडी’ समोर आली आहे. नाग्बू बेंसन ओरायजुका (३९) आणि नेहारिका ओरायजुका (३७) अशी आरोपी नायजेरीयन जोडप्याची नावे आहेत. दोघांनी मिळून भांडुपच्या एका शेअर ट्रेडिंग करणाऱ्या व्यापाऱ्याला फेसबूकवरून १४ लाखांचा गंडा घातला. भांडुपचे रहिवासी असलेले शेअर ट्रेडिंगमधील व्यापारी संदीप सिंग यांना आॅक्टोबर २०१६मध्ये इंग्लंडमधील मर्सी जॉन या तरुणीच्या नावावे ‘फ्रेण्ड्स रिक्वेस्ट’ आली. हे बनावट खाते या नायजेरीयन दम्पत्याचे होते. सिंग यांनी ‘फ्रेण्ड्स रिक्वेस्ट’ स्वीकारताच आरोपी दाम्पत्याने +४४ नंबरने सुरू होणारा एक मोबाइल नंबर सिंग यांना पाठविला. त्यावर नेहारिका व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे संदीप सिंग यांच्यासोबत संवाद साधत होती. आपण इंग्लंडमधील आॅस्ट्रिजन नावाच्या एका कंपनीत मॅनेजर असल्याचे तिने सिंगला सांगितले. सिंगचाही तिच्यावर विश्वास बसला. दोघांमध्ये संवाद वाढला. तिने सिंगची अधिक माहिती काढली. सिंग जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच, नेहारिकाने आपली कंपनी औषधे बनविण्यासाठी हर्बल सीड्स विकत घेत असल्याचे त्याला सांगितले. मात्र हे सीड्स पुरविणारा सप्लायर अमेरिकेत गेल्याने आमची कंपनी नव्या सप्लायरच्या शोधात असल्याचे तिने त्याला पटवून सांगितले. सिंगनी याबाबत अधिक विचारणा करताच नेहारिकाने दुप्पट फायद्याचे आमिष त्याला दाखविले. त्याला सिंगदेखील बळी पडला. पुढच्या टप्प्यात तिने कंपनीचे संचालक म्हणून तिचाच पती असलेल्या नाग्बूची सिंगसोबत ओळख करून दिली. त्यानंतर कंपनीच्या नावाने एक मेल सिंग यांना पाठवला. सॅम्पल पाहण्यासाठी कंपनीचा एक अधिकारी भारतात येईल, असेही तिने सांगितले. सिंगही तिच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला होता. जास्तीच्या पैशांचे त्याला स्वप्न पडू लागले होते. ही संधी साधून नेहारिकाने भारतातील एक छोटा सप्लायर ओळखीचा असून, त्याच्याकडून तू हर्बल सीड्स मागव, असे सिंगला सांगितले. नेहारिकाने सांगितलेल्या व्यक्तीसोबत संपर्क साधून सिंगने त्याच्याकडून हर्बल सीड्सचे कोटेशन मागवून घेतले. हे कोटेशन दुप्पट रक्कम करून इंग्लंडमधील मर्सी जॉनच्या तथाकथित आॅस्ट्रिजीन कंपनीला पाठविले. कंपनीने हे कोटेशन मान्य असल्याचे कळवले. पहिल्या असाईनमेंटसाठी नेहारिकाने मर्सी जॉन बनून ओळख करून दिलेल्या व्यक्तीकडून हर्बल सीड्स मागविल्या. या व्यवहारासाठी त्या व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात सिंग यांनी २ लाख ५० हजार रुपये भरले. त्यानुसार एक पार्सल कुरियरने सिंग यांच्या घरी आले. हर्बल सीड्स हाती मिळताच सिंग यांनी आॅस्ट्रीजीन कंपनीला कळविले. आॅस्ट्रीजीन कंपनीचा अधिकारी बनून विल्यम नावाने नाग्बू हाच सिंग यांना भेटण्यासाठी बीकेसीतील इंग्लंडच्या दूतावासाजवळ आला. विल्यमने सिंगकडून सीड्स घेण्याचे मान्य केले. त्यानंतर सिंगला कंपनीने ५० पॅकेटची आॅर्डर दिली. मोठी आॅर्डर मिळाल्याने सिंग यांनी हर्बल सीड्स पुरविणाऱ्या व्यक्तीला फोन केला. सीड्स पुरवणाऱ्याने आधी पैशांची मागणी केल्याने सिंग यांनी सुरुवातीला ६ लाख ५० हजार आणि त्यानंतर ३ लाख ५० हजार आरटीजीएसद्वारे दिलेल्या बँक खात्यात भरले. हे पैसे मिळताच मर्सी जॉन उर्फ नेहारिका आणि त्या सप्लायरने मोबाइल नंबर बंद केले. तुम्ही माल पाठविला नाही, म्हणून तुमचे पैसे आम्ही डॉलर्समध्ये परत करत आहोत, असा ई-मेल करून त्यासाठी कन्साईनमेंट चार्जच्या नावाखाली सिंग यांच्याकडून १ लाख २६ हजार रुपये उकळले. यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिंगने थेट भांडुप पोलीस ठाणे गाठले. त्याच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला. ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ स्वीकारताना घ्या काळजीकुठल्याही अनोळखी व्यक्तींची ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ स्वीकारताना त्याची शहानिशा करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. अनेकदा तरुण-तरुणी कुठलाही विचार न करता फक्त प्रोफाईल फोटो पाहून ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ स्वीकारतात. याचा फटका त्यांना पुढे बसतो. त्यात खातेदाराबाबत संशय येताच मुंबई पोलिसांसोबत संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या पथकाने बीकेसीमध्ये झालेल्या भेटीचे ठिकाण गाठले. त्यात मिळालेल्या माहितीत आरोपी हे दिल्लीतील रहिवासी असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी या दाम्पत्याला दिल्लीमधून अटक केली. दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी एक लॅपटॉप, १४ मोबाइल, वेगवेगळ्या देशांची सीम कार्ड, इंटरनेट डोंगल, मेमरीकार्ड, पेनड्राइव्ह जप्त केले आहेत. दोन्ही आरोपींनी सिंग यांच्यासोबतच मुंबईसह राज्यभरात आणि देशभरात आणखी काही व्यावसायिकांना फसविल्याची शक्यता आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.