शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

हिंमत असेल तर युती तोडा!

By admin | Updated: October 12, 2016 12:19 IST

‘सोबत राहायचे असेल तर आनंदाने राहा. तुमच्या मागे आम्ही भिकेचे कटोरे घेऊन येणार नाही. तुम्हाला स्वबळाचं फुरफुरं येत असेल तर आज

मुंबई : ‘सोबत राहायचे असेल तर आनंदाने राहा. तुमच्या मागे आम्ही भिकेचे कटोरे घेऊन येणार नाही. तुम्हाला स्वबळाचं फुरफुरं येत असेल तर आज, आता युती तोडण्याची हिंमत दाखवा, असे थेट आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या ५०व्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. ‘समोरून वार करणाऱ्या आमच्यासारख्यांवर मागून वार करू नका. यायचं तर सरळ अंगावर या. शिवसेनेचा वाघाचा बच्चा बसलेला आहे. तुम्ही येऊन तर बघा, मग आमचा सर्जिकल स्ट्राइक कसा असतो हे दाखवून देऊ, असे ठाकरे यांनी ठणकावले. शिवसेनेचा गड असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे इशारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे काही नेते देऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, उद्धव यांनी विधानभेत आम्ही गाफील राहिलो. २५ वर्षांचा मित्र अचानक मागून वार करेल असे वाटले नव्हते. गेल्या वेळी झाले ते दरवेळी होणार नाही. आता हा वाघाच्या बच्चा तयार आहे. युतीमध्ये मिठाचा खडा कोण टाकतंय ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावं आणि अंगावर कोणी यायचं तेही ठरवावं, अशी आपली विनंती असल्याचे ते म्हणाले. रेसकोर्सच्या २०० एकरच्या परिसरात भव्य उद्यान उभारण्याचा कालपर्यंत आग्रह धरणारे उद्धव ठाकरे यांनी आज मात्र त्या ठिकाणी, नव्या-जुन्या  पिढीला देशाच्या शौर्याची, सैन्याची माहिती देणारे भव्य ‘वॉर म्युझियम’ उभारण्याची मागणी केली. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री अनंत गिते, शिवसेनेचे सर्व नेते,मंत्री, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

गैरवापर होत असेल तर अ‍ॅट्रॉसिटीत बदल करा अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याचे स्वत: मुख्यमंत्रीही बोलले आहेत. खरेच गैरवापर होऊन कोणावर अन्याय होणार असेल तर बदल केला पाहिजे पण त्या बदलांनी पुन्हा गोरगरीबांवर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका उद्धव यांनी मांडली. (विशेष प्रतिनिधी)

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून... सर्जिकल स्ट्राइक झालेच नाही, इथपर्यंत विधाने करून देशाच्या सैन्याबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांविरुद्ध देशद्रोहाचे खटले दाखल केले पाहिजेत. अशा माणसांच्या धमन्यांमधून रक्त नाही, तर कराची, लाहोरमधील गटाराचे पाणी वाहते. एकाचवेळी सर्व निवडणुका घेण्याचा कायदा येऊ घातला आहे. तसे खुशाल करा पण मग त्या निवडणुकांत पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी विशिष्ट पक्षाचा प्रचार करता कामा नये. प्रचार करायचाच असेल तर त्यांनी अगदी अपक्ष उमेदवारांचाही प्रचार करावा. ‘सामना’मधील व्यंगचित्रावरून मी तमाम माताभगिनींची माफी मागितली. कारण, स्री ही आमच्यासाठी देवीसारखी आहे आणि तिचा अवमान आमच्या घरात होतो अशी यत्किंचितही शंका माताभगिनींना येऊ नये हा माफीचा उद्देश होता.

शिवसेना-भाजपात राडा मुंबई : मुलुंडमध्ये महापालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण दहन करण्यावरून शिवसेना-भाजपात जोरदार राडा झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुलुंड पूर्वेकडील नीलमनगर परिसरातील मैदानात भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यात येणार होते. सायंकाळी तयारी सुरू असतानाच सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसांत भिडले. ही बाब वरिष्ठांना समजताच सेनेचे शाखाप्रमुख, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्षांनी तेथे धाव घेत भाजपाचा कार्यक्रम उधळून लावला. सेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हटणार नाही, असा इशारा देत भाजपा कार्यकर्ते रात्री आठेपर्यंत तेथेच होते. 

मराठा आरक्षणाला पाठिंबा :

मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जोरदार समर्थन करून उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यासाठी शिवसैनिक त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन मागणी करतील. त्यांच्या आणि आमच्याही हाती भगवाच आहे. मात्र, आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले पाहिजे, ही शिवसेनाप्रमुखांनी मांडलेली भूमिका २५ वर्षांपूर्वीच मान्य केली असती तर आज हे मोर्चे काढण्याची वेळच आली नसती. मराठा समाजाचे आरक्षण हा त्यांचा न्यायहक्क असून तो देताना ओबीसींसह इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का लाऊ नये. ‘मी मुख्यमंत्री आहे तोवर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढेन, असे म्हणू नका. मराठा समाजाला आरक्षण देण्याची धमक दाखवा, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.