शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

गोमांस जवळ असते तर एकही दहशतवादी वाचला नसता - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 11, 2017 21:57 IST

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. यात्रेकरूंवर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 -  अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून  उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. यात्रेकरूंवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांजवळ गोमांस असते तर त्या दहशतवाद्यांपैकी एकही दहशतवादी वाचला नसता. एरवी दिसणारे गौरक्षक आता कुठे गेलेत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अमरनाथ हल्ल्यावरून सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले आहे. "अमरनाथ यात्रेवर झालेला दहशतवादी हल्ला ही भयंकर घटना आहे. हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले होणे हे केवळ भारतातच शक्य आहे." असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य करणाऱ्या तथाकथित गौरक्षकांवरही टीकास्त्र सोडले. जर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांजवळ गोमांस आढळले असते तर त्यांच्यापैकी एकही दहशतवादी वाचला नसता. आता हे गौरक्षक कुठे गेलेत, असा सवाल त्यांनी केला.  
सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेकरूंच्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरूंचा समावेश होता. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांमध्ये महाराष्ट्रातील दोन भाविकांचा समावेश होता. अधिक वाचा  ( काश्मीरमध्ये हिंदूच सुरक्षित नाहीत: मा.गो.वैद्य)(अमरनाथ यात्रेचे हल्लेखोर काश्मीरीही नाहीत आणि मुसलमानही नाही: फारूक अब्दुल्ला)( अमरनाथ हल्ल्यावरून विरोधकांचे पंतप्रधानांवर टीकास्र )
मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री ८ वाजून २0 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.