शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

काँग्रेसच्या दावणीला राष्ट्रवादी बांधण्याचा प्रयत्न झाल्यास सेना प्रवेश- बाळा भिसे

By admin | Updated: January 22, 2017 20:03 IST

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गट तट निर्माण केल्यानेच तो पक्ष संपत चालला आहे.

ऑनलाइन लोकमत

कणकवली, दि. 22 - राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गट तट निर्माण केल्यानेच तो पक्ष संपत चालला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न होत आहे. गेली अनेक वर्ष नारायण राणे यांच्याशी आम्ही संघर्ष केला आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे कधीही शक्य नसल्याने माझ्यासह अनेक कार्यकर्त्यानी शिवसेना प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळा भिसे यांनी येथे स्पष्ट केली.गेले काही दिवस बाळा भिसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून अन्य पक्षात जाणार अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. रविवारी येथील विजय भवन मध्ये जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेवून त्यानी आपण शिवसेना प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, आबू पटेल, नगरसेवक सुशांत नाईक, डॉ.प्रवीण सावंत, तालुकाप्रमुख सचिन सावंत, राजू राठोड आदी उपस्थित होते.यावेळी बाळा भिसे म्हणाले, आता पालकमंत्री असलेले दीपक केसरकर शिवसेनेत प्रवेश करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्हाला अनेक राजकीय शब्द दिले होते. मात्र, त्यांची पूर्तता झाली नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारावर दृढ राहून आतापर्यन्त आम्ही पक्ष वाढीसाठी कार्यरत राहिलो. परन्तु आमचा वेळोवेळी भ्रमनीरास झाला. या नेत्यांनी आम्हाला हुलकावणी दिली.जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जाहिर झाल्यावर प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठिची भेट घेवून जिल्ह्यातील राजकीय स्थिति बाबत त्यांचे लक्ष वेधले होते. पण उपयोग झाला नाही. त्याचबरोबर जिल्ह्याचे संपर्क नेते भास्कर जाधव यांना सर्व स्थिती सांगण्यात आली. त्यानीहि वरीष्ठाशी चर्चा केली. त्याचाही काही उपयोग झाला नाही. आता काँग्रेसच्या दावणीला राष्ट्रवादी पक्ष बांधण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 'सिंधुदुर्गात राणेना दुखवून चालणार नाही' असा संदेश आम्हाला वरीष्ठाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता आम्हाला इतर पक्षात जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना त्याचा स्थानिक स्तरावर किती उपयोग होतो हे महत्वाचे असते. शिवसेना हा पक्ष आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य जनतेसाठी विकासात्मक काम करीत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आमच्या कार्यकर्त्याना या पक्षात मानसन्मान मिळावा तसेच विकासाभिमुख कामे व्हावित एवढीच आम्ही शिवसेनेकडून अपेक्षा ठेवली आहे. बाकी कुठल्याही अटी पक्ष प्रवेश करताना ठेवलेल्या नाहीत.असेही ते यावेळी म्हणाले.(प्रतिनिधी)25 जानेवारी रोजी प्रवेश !कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात 25 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता शिवसेनेचा भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्यात माझ्यासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील. मात्र त्यांची नावे आता जाहीर केली तर विरोधक त्यांना त्रास देतील. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये काही काँग्रेस कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. पालकमंत्री दीपक केसरकर , शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्यासह अन्य प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. कणकवली शहरातून यावेळी रॅली ही काढण्यात येणार आहे, असे बाळा भिसे यावेळी म्हणाले.हे तर पोस्टर बॉय चे काम !शिवसेना प्रवेश करताना आम्ही कोणतीही अट ठेवलेली नाही. मला महामंडळ किंवा आमदारकी पाहिजे अशी आमची मागणी नाही. हे तर पोस्टर बॉयचे काम आहे.अशी टिकाहि भिसे यांनी कोणाचेही नाव न घेता यावेळी केली. तसेच 25 जानेवारी नंतर राष्ट्रवादिकडे जिल्ह्यात फक्त कबड्डीची टीमच राहील असे ही ते म्हणाले.शिवसेनेला चांगला प्रतिसाद !सामान्य जनतेला न्याय देण्याबरोबरच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्ते तसेच नेत्यांचा योग्य तो सन्मान केला जात आहे. यापुढेही केला जाईल. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनतेचा चांगला प्रतिसाद शिवसेनेला मिळत आहे. लवकरच जिल्ह्यात एक वेगळे चित्र आपल्याला पहायला मिळेल, असे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.