शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपींनी महिलांची छेडछाड केल्यास दहा वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: April 25, 2017 02:13 IST

दारू पिऊन महिलांची छेडछाड करणाऱ्या गुन्हेगाराला सात ते दहा वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आणि ५ लाखांपर्यंत दंडाची तरतूद नवीन दारूबंदी कायद्यामध्ये केली आहे

पारनेर (जि. अहमदनगर) : दारू पिऊन महिलांची छेडछाड करणाऱ्या गुन्हेगाराला सात ते दहा वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आणि ५ लाखांपर्यंत दंडाची तरतूद नवीन दारूबंदी कायद्यामध्ये केली आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.अण्णा हजारे व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात गत आठवड्यात राळेगणसिद्धी येथे चर्चा झाल्यानंतर कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यात आतापर्यंत शिक्षेविषयी संभ्रम होता. तो आता दूर झाला आहे, असे हजारे म्हणाले.एखाद्या हॉटेलमध्ये विना परवान्याची दारू विकली जाते. या संबंधाने ग्रामरक्षक दलाने पोलीस निरीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याला कळविल्यानंतर त्यांनी त्या हॉटेल मालकांवर कारवाई करायची आहे. हॉटेल मालकावर दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या हॉटेलचा परवाना तत्काळ रद्द करावयाचा आहे.ज्या गावातील २५ टक्के महिला ग्रामसभा घेऊन ठराव करीत असतील, की आमच्या गावात ग्रामरक्षक दल करण्यात यावे किंवा ग्रामपंचायतीने बोलविलेल्या ग्रामसभेमध्ये ५० टक्के लोकांनी ठरविले की आमच्या गावात ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात यावे. तर तसा अर्ज उप विभागीय दंडाधिकारी यांच्याकडे जाईल. उप विभागीय दंडाधिकारी तहसीलदारांना कळवतील व त्यानंतर तहसीलदार ग्रामरक्षक दल निवडीसाठी दिनांक, वार व वेळ निश्चित करून विशेष ग्रामसभा बोलावतील. सदर ग्रामसभेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाईल. तो ग्रामसभेचा पुरावा असेल. ग्रामसभा ग्रामरक्षक दलामध्ये कोण सदस्य असावेत, त्यांची नावे सुचवतील. दलामध्ये ३३ टक्के महिला असतील, असे हजारे म्हणाले. (प्रतिनिधी)